उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसला – रामदास आठवले

167

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत विश्वासघाताचा खंजीर खुपसला आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी  व्यक्त केलेले मत योग्य आहे, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

भाजपशी पुन्हा युती करावी

शिवसेना भाजप यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली. निवडणूक लढवताना भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे जाहीर करण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद शिवसेनेला हवे याबाबत काहीही म्हणाले नाहीत. मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मित्र पक्ष भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली. कॉंग्रेसशी युती करून उद्धव ठाकरे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा केली आहे. खरेतर दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या शिवशक्ती भीमशक्ती युतीचा प्रयोग उद्धव ठाकरे यांनी सुरू ठेऊन भाजपशी अजूनही पुन्हा युती करण्याचा निर्णय घेतला पाहिजे, अशी अपेक्षा रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

( हेही वाचा:धक्कादायक! महाराष्ट्र सर्वाधिक कर्जबाजारी, जाणून घ्या तुमच्या डोक्यावर किती आहे कर्ज )

मतदारांशी विश्वासघात

महाविकास आघाडी सरकार हा जनमताचा अवमान आहे. जनतेने शिवसेना भाजप युतीला बहुमत दिले होते. मात्र मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही जाहीर शब्द भाजपने दिला नव्हता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आघाडीसोबत केलेला युतीचा प्रयोग मतदारांशी विश्वासघात आहे, असे रामदास आठवले म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.