औरंगाबादनंतर पुण्यातही आल्या ऑनलाईन ९२ तलवारी!

150

कुरिअर सेवा हे कमी वेळेत वस्तू पोहोचवण्याचं सोपं साधन बनलं असून अनेकजण ही सेवा वापरताना दिसत आहेत.  तलवारी ऑनलाईन मागवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्याचे समोर आले आहे. औरंगाबादमध्ये कुरियरने एकाचवेळी तब्बल ३७ तलवारी मागवण्यात आल्या होत्या. औरंगाबादनंतर आता पुण्यातील पिंपरीत कुरियरच्या पार्सलमध्ये तब्बल ९२ तलवारी २ कुकरी आल्याचा धक्कादायक प्रकार दिघी येथे उघडकीस आला. हा शस्त्रसाठा पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केल्याची माहिती मिळतेय.

या तलवारी कोणी मागवल्या याचा तपास सुरू

उमेश सूद, अनिल होन, मनिंदर, आकाश पाटील यांच्यावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर यांनी असे सांगितले की, शुक्रवारी आम्हाला पुण्यातील एका कुरिअर कार्यालयातून एक मोठे, संशयास्पद पार्सल असल्याचा फोन आला. आमच्या कर्मचाऱ्यांनी ते पॅकेज उघडले, तेव्हा त्यांना तलवारी आढळल्या. पॅकेज लुधियानाचे आहे. या तलवारी कोणी मागवल्या याचा तपास सुरू आहे.

(हेही वाचा – माजी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात दाखल)

औरंगाबादमध्ये कुरियरने ३७ तलवारी मागवण्यात आल्या

तसेच त्यांनी पुढे असेही सांगितले की, काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्येही अशीच एक घटना समोर आली होती, जिथे कुरिअरद्वारे १५ हून अधिक तलवारी मागवण्यात आल्या होत्या. त्या लुधियानाहूनही आल्या होत्या. आम्ही दोन्ही प्रकरणांचा तपास करत आहोत. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादमध्ये कुरियरने एकाचवेळी तब्बल ३७ तलवारी मागवण्यात आल्या होत्या परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळीच उघडीस आला. या प्रकारामुळे संपूर्ण औरंगाबाद शहर हादरून गेले आहे. ३७ तलवारी एकाचवेळी कोणी व का मागवल्या असतील याचा शोध सध्या औरंगाबाद पोलीस घेत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.