पुण्यातील एका खासगी शाळेत पालकांना धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील उंड्री या भागात युरो शाळेच्या सुरक्षा रक्षकांकडून पालकांना ही वागणूक मिळाल्याचे स्पष्ट झाले. बिबवेवाडी येथील क्लाइन मेमोरियल शाळेनंतर पुण्यात पुन्हा एकदा हा प्रकार घडला आहे.
बाऊन्सरकडून पालकांना धक्काबुक्की
शालेय शुल्काबाबत शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार करणाऱ्या पालकांना शाळेकडून दुजाभाव करण्यात आला. संबंधित विद्यार्थ्यांना शाळेने प्रवेश नाकारलाच, एवढेच नव्हे तर खुद्द शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आदेशाला शाळेने केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे. नुकताच बिबवेवाडी येथील शाळेतील बाऊन्सरकडून पालकांना मारहाण झाल्याचा मुद्दा विधानसभेत गाजला. त्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी देखील शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या सूचना केल्या. परंतु शाळेत प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत पोचले आणि शाळेतील सुरक्षा रक्षक आणि बाऊन्सर यांच्याकडून पालकांना धक्काबुक्की करण्यात आली.
(हेही वाचा – माजी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात दाखल)
शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला शाळेकडून केराची टोपली
आता शिक्षणमंत्री अशा मुजोर शाळांवर काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकारानंतर पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, पुण्यात खाजगी शाळेत बाऊन्सर्सकडून सातत्याने पालकांना मारहाण होण्याच्या घटनेत वाढ होत आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाला शाळेकडून केराच्या टोपल्या दाखवण्यात येत असल्याचे पालकांकडून सांगण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community