एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी मागच्या पाच महिन्यांपासून एसटी कर्माचा-यांचा संप सुरु आहे. अद्यापही सपं मिटलेला नसून, प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच आता सण समारंभामुळे एसटीला जी कमाई होते त्यावरही आता पाणी सोडावे लागत आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.
कंत्राटी चालकांची नियुक्ती
लालपरी पुन्हा धावण्यासाठी एसटी महामंडळाने निवृत्त झालेल्या कर्मचा-यांना पुन्हा कामावर बोलावण्याची योजना आखली आहे. तसेच, परिवहन मंत्री अनिल परब यांनी दखल घेत 11 हजार कंत्राटी चालकांची नियुक्ती केली जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता लवकरच लालपरी धावण्याची शक्यता आहे.
( हेही वाचा: एसटीअभावी प्रवाशांचे आतोनात हाल, अद्यापही संप सुरुच )
ग्रामीण भागातील फे-या प्राधान्याने सुरु करणार
11 हजार कंत्राटी कर्मचा-यांच्या मदतीने एसटीची सेवा पूर्ण क्षमतेने सुरु करण्याचा एसटी महामंडळ प्रशासनाचा प्रयत्न सुरु आहे. सध्या फक्त 34 हजार 586 एसटी कर्मचारी कर्तव्यावर आहेत. तब्बल 47 हजार 97 एसटी कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे भविष्यात एसटीच्या सेवेचा गाडा कंत्राटी कर्मचा-यांच्या भरवशावर चालणार असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील फे-या प्राधान्याने सुरु करण्याबाबत नियोजन असल्याचे एसटी प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
Join Our WhatsApp Community