गेल्या दोन पासून कोरोनाचे सावट संपूर्ण जगावर पसरले आहे. त्यामुळे विवाह विधीमध्ये खूप अडचणी येत आहे. सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी कोरोना पूर्णतः नष्ट झाला असे म्हणता येणार नाही. अशातच अनेक जण विवाह इच्छूक यंदा आपले कर्तव्य पार पाडू इच्छित आहेत. कोरोनाच्या निर्बंधांमध्ये शिथिलता येताच अनेकांना लगीन घाई सुरू केली आहे. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नववर्षात (२०२२ ते २०२३) यंदा विवाहाचे ८९ मुहूर्त असून, त्यात शुद्ध शास्त्रानुसार ६२, तर चातुर्मास काळातील आपत्कालीन, असे २७ मुहूर्त काढण्यात आले आहेत.
(हेही वाचा – एसटीअभावी प्रवाशांचे आतोनात हाल, अद्यापही संप सुरुच)
भारतीय प्राचीन आश्रम व्यवस्थेतील पहिल्या ब्रह्मचर्य आश्रमात प्रवेश करताना करावा लागणारा उपनयन (मुंज) संस्कार महत्त्वाचा मानला जातो. या संस्काराचे एकूण ४७ मुहूर्त असून, २२ मुहूर्त हे शुद्ध शास्त्रीय, तर २५ मुहूर्त हे आपत्कालीन आहे. ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी विवाहासह इतर धार्मिक कार्यक्रमाकरता दिलेल्या मुहूर्ताची यादी खालील प्रमाणे…
चैत्र ते आषाढ मास (२०२२)
- एप्रिल – १५, १७, २१, २४, २५ (पाच दिवस)
- मे – ४, १०, १३, १४, १६, १८, २०, २१, २२, २५, २६, २७ (१२ दिवस)
- जून – १, ६, ८, १०, १३, १४, १४, १६, १८ (नऊ दिवस)
- जुलै – ३, ५, ६, ७, ८, ९ (सहा दिवस)
मार्गशीर्ष ते फाल्गुन (तुळशी विवाहानंतर २०२२-२३)
- नोव्हेंबर – २५, २६, २८, २९ (चार दिवस)
- डिसेंबर – २, ४, ८, ९, १४, १६, १७, १८ (आठ दिवस)
- जानेवारी – १८, २६, २७, ३१ (चार दिवस)
- फेब्रुवारी – ६, ७, १०, ११, १४, १६, २३, २४, २७, २८ (१० दिवस)
- मार्च – ९, १३, १७, १८ (चार दिवस)
चातुर्मासातील आपत्कालीन विवाह मुहूर्त- आषाढ ते कार्तिक (२०२२)
- जुलै – १४, १५, ३१ (तीन दिवस)
- ऑगस्ट – ३, ४, ७, ९, १०, १५, १६, २०, २१, २९ (१० दिवस)
- सप्टेंबर – ७, ८, २७, ३० (चार दिवस)
- ऑक्टोबर – ६, ९, १०, ११, २१, ३१ (सहा दिवस)
- नोव्हेंबर – ५, ६, १०, १७ (चार दिवस)
गौणकाळातील व चातुर्मास काळातील मुहूर्त (२०२२)
- जुलै – १, ४, १५, १८ (चार दिवस)
- ऑगस्ट – ३, ७, १४, १६, २९ (पाच दिवस)
- सप्टेंबर – ६, २७, ३० (तीन दिवस)
- ऑक्टोबर – ५, ११, ३० (तीन दिवस)
- नोव्हेंबर – ३, १३, १४, २८ (चार दिवस)
- डिसेंबर – २, ४, २७ (तीन दिवस)
- जानेवारी – १, ९, १२ (तीन दिवस)
उपनयन संस्कार – मुख्य काळातील मुहूर्त (२०२२-२३)
- एप्रिल – ३, ६, ११, १३, २१ (पाच दिवस)
- मे – ५, ६, ११, १८, २० (पाच दिवस)
- जून – १, ६, १६ (तीन दिवस)
- जानेवारी – २६, ३१ (दोन दिवस)
- फेब्रुवारी – ८, १०, २२, २४ (चार दिवस)
- मार्च – १, ३, ९ (तीन दिवस)