नायब तहसीलदार शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी भाजप नेते आणि राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांना दोषी ठरवण्यात आले आहे. अनिल बोंडेंना तीन महिन्यांची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे.
काय आहे प्रकरण
मात्र न्यायालयाने अनिल बोंडे यांना लगेच जामीनही मंजूर करत त्यांची सुटका केली आहे. 2016 मध्ये अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेचे शेकडो लाभार्थी वंचित असल्याने भाजप नेते व तत्कालीन आमदार अनिल बोंडे यांना मिळाली. दोन्ही योजनेचे काम नायब तहसीलदार काळे यांच्याकडेच असल्याने बोंडे यांनी याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली.
( हेही वाचा :संजय राऊतांना ईडीचा दणका! मुंबई,अलिबागमधील संपत्ती जप्त )
बोंडेंची सूटका
त्यावेळी काळेंनी लाभार्थ्यांना योजनेच्या कागदपत्रांसोबत पाच रुपयांचे कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक असल्याचे बोंडे यांना सांगितले. त्यामुळे अनिल बोंडे व नायब तहसीलदार नंदकिशोर काळे यांच्यात वाद झाला. शाब्दीक चकमक उडाल्याने बोंडे यांनी काळे यांना मारहाण केली होती. तक्रारीवरून वरुड पोलिसांनी अनिल बोंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता, तर मंगळवारी तब्बल पाच वर्षांनंतर अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयाने अनिल बोंडे यांना तीन महिने सश्रम कारावास व 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे, तर अनिल बोंडे यांच्या पत्नी वसुधा बोंडे यांनी त्यांच्या जमानतीसाठी अर्ज दाखल केला व न्यायालयाने अनिल बोंडे यांना जमानत दिली.