शिवसेनेचे 14 खासदार भाजपच्या संपर्कात, आता सेनेकडे उरले काय?

137

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेनेतील खासदार नाराज असल्याचे नुकतेच समोर आले आहे. सोमवारी नवी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत खासदारांनी ही नाराजी व्यक्त केली. शिवसेनेतील हा अंतर्गत कलह समोर येत असतानाच, आता भाजप आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेतील जवळपास सर्वच आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा धक्कादायक खुलासा भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

14 खासदार भाजपच्या संपर्कात

शिवसेनेतील जवळ जवळ सर्वच खासदार हे भाजपच्या संपर्कात आहेत. 18 पैकी 13 ते 14 शिवसेना खासदार हे भाजपमधील वरिष्ठांच्या संपर्कात आहेत. शिवसेनेतील सर्वच खासदार हे महाविकास आघाडी सरकार आणि विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांवर नाराज आहेत. नरेंद्र मोदींशिवाय आपण निवडून येऊ शकत नाही, हे या खासदारांना चांगलेच माहीत आहेत. त्यामुळे हे खासदार सध्या भाजपच्या संपर्कात आहेत. 2024 च्या निवडणुकांवेळी हे खासदार भाजपमध्ये आलेले असतील, असा खळबळजनक गौप्यस्फोट प्रसाद लाड यांनी केला आहे.

(हेही वाचाः संजय राऊतांना ईडीचा दणका! मुंबई,अलिबागमधील संपत्ती जप्त)

काय आहे नाराजीचं कारण?

नाराज असलेले हे सर्व खासदार हिंदुत्वाची भूमिका घेऊन शिवसेनेत राहिले आहेत. शिवसेनेने आता ज्याप्रकारे हिंदुत्वाची भूमिका सोडून, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर बसत सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे या खासदारांमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. आपल्या मतदारसंघातील जनतेला उत्तर देण त्यांना कठीण जात आहे. त्यामुळए हिंदुत्वाची भूमिका घेणा-या पक्षासोबत हे खासदार जातील, असा स्पष्ट विश्वास लाड यांनी व्यक्त केला आहे.

2024 मध्ये भाजपचे इतके खासदार लोकसभेत जाणार

2024 मध्ये भाजपचं सरकार येईल असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. राज्यातील एकूण 48 खासदारांपैकी भाजपचे जवळपास 40 खासदार हे लोकसभेत निवडून जातील अशी आपल्याला खात्री असल्याचे देखील प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः ‘कोणी कितीही प्रयत्न केला तरी माझं नाव हटवता येणार नाही’, फडणवीसांचा थेट इशारा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.