कारवाई होणारच! किरीट सोमय्यांचा हल्लाबोल

139

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट सांगितले होते की केंद्रीय तपास यंत्रणा या प्रामाणिकपणे कारवाई करत आहेत. त्यामुळे राऊत यांनी जरी १२ पानी पत्र लिहिले किंवा राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्र लिहिले, तरी कारवाई करण्यात येईल, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणाले.

ईडीने शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावरील संपत्ती जप्ती करण्याची कारवाई केल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली.

(हेही वाचा याची कल्पना होती, मला अटकही होईल!)

राऊतांनी ५५ लाख रुपये परत केले

संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्या उद्धट सरकारला वाटत असेल की पोलिसांचा माफियासारखा वापर करून केंद्रीय तपास संस्थांमधील प्रामाणिक अधिकाऱ्याचे तोंड बंद करता येईल, परंतू कारवाई होणार आहे. प्रविण राऊतचे मित्र स्नेही संजय राऊत, उद्धव ठाकरे यांचे उजवे हात जे प्रविण राऊतचे मित्र आहेत, स्नेही आहेत आणि भागीदार आहेत. संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्या पत्नीचे आर्थिक व्यवहार बाहेर आलेले आहेत. आज ईडीने कारवाई करून संजय राऊत यांची अलिबागमधील काही जमीन, संपत्ती आणि दादरमधील एक फ्लॅट जप्त केला आहे. संजय राऊत यांना आधीच लक्षात आले म्हणून त्यांनी १० महिन्यांपूर्वी ईडी कार्यालयात जाऊन ५५ लाख रुपये परत केले होते. ईडीची काही दिवस कारवाई सुरू होती. आमच्याकडे देखील माहिती येत होती. गेले दोन महिने संजय राऊत यांची धडपड, धावपळ, बोगस पत्र व्यवहार, ईडीवर आरोप करणे, किरीट सोमय्या, निल आणि मेधा सोमय्या यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे ही मानसिक अवस्था मी समजू शकत होतो, असेही किरीट सोमय्या यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.