हापूस फक्त कोकणचाच!

143

एप्रिल-मे महिना आला की, आतुरता लागते कोकणातील आंब्याची! कोकणातील हापूस आंबा हे सर्वांचे आवडते फळ त्यामुळे आंब्याला बाजारात मोठी मागणी असते. पुणे जिल्ह्यात जुन्नर भागातील आंब्याला सुद्धा वेगळे वैशिष्ट्य आहे. या आंब्यासंदर्भात मध्ययुगीन कालखंडात आणि शिवकालीन ग्रंथात उल्लेख आढळतो. याचा आधार घेत जुन्नरच्या आंब्याला भौगोलिक मानांकन मिळवून देण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पण याला कोकणातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. ‘हापूस’ हा फक्त कोकणचाच आहे असे कोकणच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

( हेही वाचा : लालपरी लवकरच पुन्हा धावणार,महामंडळाने घेतला हा मोठा निर्णय! )

कोकणच्या शेतकऱ्यांचा विरोध

हैदराबादच्या राष्ट्रीय संस्थेत भौगोलिक मानांकन प्राप्त करण्यासाठी जुन्नरच्या शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केला आहे. पण याला कोकणातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. हापूस हा फक्त कोकणचा आहे असे येथील शेतकऱ्यांनी म्हटले आहे. भौगोलिक मानांकन प्राप्त झाल्यास जुन्नरच्या पर्यटनात भर पडणार आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी टीम सुद्धा कार्यरत आहे. जुन्नरचा आंबा चव, रंग, सुगंध या सर्व बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणूनच आंब्याला शिवनेरी हापूस म्हणून मानांकन मिळावे असे प्रयत्न सरकारकडून सुरू झाले आहेत. ही प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी नारायणगावच्या कृषी विज्ञान केंद्रावर सोपवण्यात आली असून त्यासाठी तीस लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. परंतु यास कोकणचे शेतकरी तीव्र विरोध करत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.