माजी आयपीएस अधिकारी वाय.पी.सिंह यांच्या पत्नी प्रसिद्ध वकील आभा सिंह यांचे ट्विटर खाते हॅक करून त्याच्यावर एका मुस्लिम व्यक्तीचा फोटो लावण्यात आला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हॅकरने ट्विटर खाते हॅक करून ते पूर्ववत करण्यासाठी आभा सिंह यांच्याकडे चक्क ५०० डॉलर्सची मागणी केली आहे. या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून वरळी पोलीस ठाणे तसेच सायबर गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करीत आहे.
५०० डॉलर्सची मागणी
आभा सिंह यांच्याशी काही दिवसांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीने संपर्क साधला होता, ट्विटर खाते व्हेरिफाय करून देतो त्यामुळे फॉलोवर वाढतील असे सांगून आभा सिंह यांच्या ट्विटर खात्याची सर्व माहिती घेतली. २९ मार्च रोजी आभा सिंह त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्याच्या डीपीचा फोटो बदलून त्या जागी एका मुस्लिम व्यक्तीचा फोटो लावण्यात आला असल्याचे लक्षात आले, व आपले ट्विटर हॅक केल्याचे लक्षात आले, त्यानंतर हॅकरने ट्विटर खात्याचे अधिकार परत देण्यासाठी आभा सिंह यांच्याकडे ५०० डॉलर्सची इन्स्टाग्रामवर मेसेज करून मागणी केली.
( हेही वाचा : अन्यथा तुमच्या स्मार्टफोनचा होऊ शकतो स्फोट! )
आभा सिंह यांनी ३ एप्रिल रोजी वरळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आभा सिंह यांचे हॅक करण्यात आलेले ट्विटर खाते पूर्ववत करून दिले आहे. पोलीस या हॅकर्सचा शोध घेत आहे.
Join Our WhatsApp Community