पीएनबी बॅंकेत तुमचे खाते आहे? मग ही बातमी तुमच्यासाठी!

141

पंजाब नॅशनल बॅंकेने आपल्या बचत खात्यावरील कपात पुन्हा एकदा कमी केली आहे. त्यामुळे पीएनबीच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. 10 लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बॅंक खात्यांसाठीचे व्याजदर सार्वजनिक खात्यांचा व्याजदर वार्षिक 2.75 टक्के करण्यात आला आहे. हे नवे व्याजदर 4 एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत.

सलग दुस-यांदा व्याजदरात कपात

बँकेने यापूर्वी फेब्रुवारी 2022 मध्ये व्याजदरात कपात केली होती आणि आता व्याजदरात कपात करण्याची ही दुसरी वेळ असून, फेब्रुवारीमध्ये 10 लाख रुपयांपर्यंत शिल्लक असलेल्या खात्यांसाठी 2.75% व्याजदर होता. त्याचवेळी, 10 लाख रुपयांपासून ते 500 रुपयांपेक्षा कमी बचत खात्यांसाठी वार्षिक 2.80% दराने व्याज दिले जात होते. या दोन्ही खात्यांवर 0.05% व्याजदर कपात करण्यात आली आहे.

( हेही वाचा: हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मनसेने शिवसेनेला पुन्हा घेरले, शिवसेना भवनाबाहेर केली बॅनरबाजी! )

नवीन नियम लागू झाला

पंजाब नॅशनल बॅंकेने 4 एप्रिल 2022 पासून 10 लाख रुपये किंवा त्याहून आधिक रकमेच्या धनादेश पेमेंटसाठी अनिवार्य पाॅझिटिव्ह पे सिस्टिम लागू केली आहे. त्यामुळे 18 कोटींहून अधिक ग्राहक धनादेश फसवणुकीपासून वाचतील. नव्या नियमानुसार, बॅंकेला संबंधित धनादेश वटवल्यानंतर संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.