वीज ग्राहकांना वीजबीले सुलभरितीने भरता यावीत यासाठी आता ‘बेस्ट’ने नवा उपक्रम हाती घेतला आहे. वीजदेयके भरण्यासाठी फिरते देयक भरणा केंद्र म्हणजेच मोबाईल व्हॅन सेवा 7 एप्रिलपासून सुरु करण्यात येणार आहे.
ही बिलेही भरता येणार
वीज देयकांव्यतिरिक्त पाणी, मालमत्ता आणि इतर महापालिका सेवा कर, गॅस, डीटीएच, क्रेडिट कार्ड, शैक्षणिक शुल्क, फास्टॅग रिचार्ज, सदस्यता शुल्क, दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी यांची बिलेही या मोबाईल व्हॅनमध्ये भरता येणार आहेत.
या भागात उभे केले जाणार केंद्र
ब्राॅंडबॅंड सेवांचे प्रदान, बेस्टच्या किऑस्क आणि इतर बिल भरण्याकरता फिरते भरणा केंद्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. हे केंद्र मुंबईतील विविध भागांत जाईल. त्याचे नियोजनही करण्यात येणार आहे. बेस्टच्या या उपक्रमाचे लोकार्पण 7 एप्रिलला केले जाणार आहे. कुलाबा येथील बेस्टच्या मुख्यालयात हा कार्यक्रम होणार आहे. पहिल्या दिवशी वरळीला प्रेमनगर भागात हे केंद्र उभे राहणार आहे.
Join Our WhatsApp Community