वातावरण चिघळणार? राज ठाकरेंच्या नावाला फासलं काळं!

166

पुण्याच्या कोंढव्यातील नुरानी कब्रस्तानचा भूमिपूजनाचा कार्यक्रम राज ठाकरे यांच्या हस्ते झाला होता. राज ठाकरे यांच्या नावाला काळा रंग लावून स्थानिक लोकांनी त्यांचा निषेध दर्शवला आहे. मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून मुस्लीम बांधवांमध्ये नाराजी असल्याचे समोर आले आहे.

… म्हणून फासलं राज ठाकरेंच्या नावाला काळं

या बांधवांच्या भावना दुखावल्याने पुण्यात याधीच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर दुसरीकडे पुण्यात मनसेने पोलीस आयुक्तांना पत्र लिहून चार दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. चार दिवसात भोंगे न काढल्यास पुण्यात दुप्पट भोंगे लवून हनुमान चालिसा म्हणणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुण्यात मुस्लीम बांधवांनी राज ठाकरे यांनी उद्घाटन केलेल्या कब्रस्तानावर असलेले राज ठाकरे यांच्या नावाना काळा रंग लावला. राज ठाकरे यांच्या निर्णयाचा निषेध त्यांनी नोंदवला आहे.

(हेही वाचा – दुसरा धक्का! आणखी एका पदाधिकाऱ्याचा मनसेला रामराम)

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन खळखट्याक!

मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन मनसेचे पुणे शहरात खळखट्याक उडणार का असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, डेक्कन परिसरातील सर्व मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेने पत्र दिलं आहे. यासंदर्भात पुणे शहर मनसेकडून शहरातील पोलीस स्टेशनला पत्र लिहलं आहे. डेक्कन पोलीस स्टेशन, विश्रामबाग, फरासखाना पोलीस स्टेशनला पत्र दिलं आहे. मनसेकडून या मशिदींना भोंगे काढण्यासाठी चार दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. भोंगे न काढल्यास दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची माहिती राज्य सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.