मोदी-पवार भेटीमुळे राजकारणात तर्कवितर्कांना उधाण

142

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा कायम आहे. आगामी स्थानिक निवडणुकीच्या दृष्टीने भाजप आणखी आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे, दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

बारा आमदारांचे नियुक्तीसंदर्भात भेट – अजित पवार

बारा आमदारांचे नियुक्तीसंदर्भात आम्ही शरद पवारांशी बोललो होतो, त्यानुसार त्यांनी ही भेट घेतली असावी, अशी प्रतिक्रिया या भेटीवर अजित पवारांनी दिली. गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्यात बारा आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा रखडलेला आहे. राज्यपालांकडून या बारा आमदारांच्या नियुक्तीला ब्रेक लागला आहे. याबाबत आधीही अनेकदा चर्चा आणि भेटी झाल्या आहेत. मात्र अद्याप याबाबत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे पवारांनी या आदारांच्या नियुक्तीबाबत थेट मोदींची भेट घेऊन चर्चा केली, असावी असे अजित पवार म्हणाले आहे.

(हेही वाचा दिल्लीत खलबतं! पवारांनी घेतली मोदींची भेट, कोणत्या विषयावर झाली चर्चा?)

भाजपची राष्ट्रवादीशी कटुता नाही! – सुधीर मुनगंटीवार 

नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात भेट होत असेल, तर चांगलेच आहे, भाजप आणि शिवसेनेत यांच्यात कटुता आहे, पण भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात कटुता नाही. काल नितीन गडकरी हे शरद पवार यांच्या घरी गेले होते, आज नरेंद्र मोदी यांच्याशी भेट झाली आहे. हे दोन अतिशय मोठे नेते आहेत, त्यामुळे त्यांच्यात काही राज्यातील विषयांवर चर्चा झाली का, हे पाहावे लागेल. पण राजकीय संस्कृतीत वैचारिक मतभेद असू शकतात मनभेद असू शकत नाही. मात्र टीका करताना एकमेकांचा सन्मान होईल, याची खबरदारी घेणे गरजेचे असते, काँग्रेस त्यांच्या कटुता नाही.

डॅमेज कंट्रोलसाठी भेट – प्रवीण दरेकर

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर म्हणाले की, ईडीच्या ससेमिरामुळे शरद पवार डॅमेज कंट्रोलसाठी दिल्लीत गेले असतील, शरद पवार हे डॅमेज कंट्रोलसाठी पटाईत आहेत. हे संपूर्ण देशाला माहीत आहे. मग तो भूकंप असो अथवा नैसर्गिक आपत्ती असो. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. राऊत हे सेनेचे नेते असले तरी पवारांच्या जवळचे आहेत. ते त्यांच्याशी एकनिष्ठ आहेत. आता राऊतांची अडचण झाल्यावर याचे गांभीर्य कमी व्हावे, म्हणून त्यासाठी प्रयत्न पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पंतप्रधान मोदी यांनी आधीच, अशा लोकांना सहन करणार नाही, असे सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.