ट्विटरवर झोमॅटो, फूड डिलिव्हरी अॅप्स ट्रेंड होत आहेत. झोमॅटो, स्विगी या अॅप्समध्ये बिघाड झाल्यामुळे ट्विटरवर या दोन्ही फूड डिलिव्हरी अॅप्सचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ऐन दुपारच्या जेवणाच्या वेळीच फूड ऑर्डर सेवा बंद झाल्यामुळे नेटिझन्स भडकले आहेत. तांत्रिक समस्येमुळे डिलिव्हरी करताना, युजर्स ऑर्डर देऊ शकत नव्हते तसेच अॅपमधील मेन्यू सुद्धा लोड होत नव्हता. यावर आमची टीम काम करत असून लवकरच सेवा पूर्ववत होईल असे ट्वीट करत झोमॅटोने दिलगिरी व्यक्त केली आहे. तर, स्विगी केअर्सने या समस्येचे लवकरात लवकर निराकरण होईल आम्हाला सहकार्य करा असे ट्वीट केले.
( हेही वाचा : विदर्भात उष्णतेची लाट, तर राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता! )
https://twitter.com/mevishalbansal/status/1511641768025989128
नेटकऱ्यांनी घेतला समाचार
झोमॅटो आणि स्विगी (Zomato swiggy down) हे दोन्ही फूड डिलिव्हरी अॅप्स लंच टाईमला डाऊन झाल्यामुळे ‘अब पार्लेजी खाना पडेगा असे ट्वीट एका युजर्सने केले होते.’ तर अजून एका युजरने झोमॅटो, स्विगी डाऊन झाल्यामुळे घरचे जेवण जेवणाऱ्या लोकांना काही फरक पडत नाही असे ट्वीट केले आहे.
#Zomato and #Swiggy down: Netizens flood memes saying, 'Ab toh weight loss ho hee jaayega'https://t.co/6Rkhi6IiA9
— India TV (@indiatvnews) April 6, 2022
दरम्यान देशभरात रोज लाखो लोक ऑनलाईन फूड ऑर्डर करतात. त्यामुळे या सेवा डाऊन झाल्यामुळे युजर्सची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली.
Join Our WhatsApp Community*me ordering food#Zomato and #Swiggy goes down pic.twitter.com/Aq3fQ6dwop
— Yuvraj Pratap Rao 🇮🇳 (@yuvrajuv444) April 6, 2022