केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत भाजप शिवसेनेसह विरोधकांवर कारवाई करीत आहे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर अशाच पध्दतीने दडपशाही, हुकुमशाही पध्दतीने ईडीव्दारे मालमत्ता जप्तीची कारवाई केली गेली, असा आरोप करीत आज धुळ्यात शिवसेना रस्त्यावर उतरली. खवळलेल्या शिवसैनिकांनी भाजपच्या विरुध्द जोरदार घोषणाबाजी करीत ईडीचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. यावेळी सहसंपर्क प्रमुख माजी नगराध्यक्ष महेश मिस्तरी यांनी तीव्र संताप व्यक्त करीत थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी किरीट सोमय्या यांच्या पोस्टरवर लघुशंका करण्याचा प्रयत्न केला. शिवसैनिकांनी टरबुज फोडत तीव्र निषेध केला.
(हेही वाचा -निवडणुकीवर डोळा ठेऊन अशी भाषणं करणं परवडणार नाही,अजितदादांचा राज ठाकरेंना टोला)
धुळ्यातील जुन्या महापालिका इमारतीच्या समोर बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अचानक एकत्र येत संजय राऊत यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने केलेल्या मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा निषेध करीत आंदोलन करण्यात आले. शिवसैनिकांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी किरीट सोमय्या यांच्या पोस्टरला जोडे मारले. ईडीच्या विरोधात घोषणाबाजी करुन पुतळा जाळला. फडणवीसांच्या विरोधात घोषणाबाजी करुन टरबुज फोडत निषेध केला. यावेळी सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी यंानी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर रंगा-बिल्ला म्हणत जोरदार टिका केली.
तुंरुगांत टाका मागे हटणार नाही
केंद्रात बसलेल्या रंगा-बिल्ला यांच्या सरकारने लोकशाहीची हत्या करीत मनमानी कारभार चालवला आहे. यांच्या विरुध्द आवाज उठवणार्यांवर हे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन खोट्या कारवाई करीत नाहक त्रास देत आहेत. देशाला हुकुमशाही पध्दतीने चालवून विनाशाकडे आणि अराजकाकडे घेवून जात आहे. शेजारील पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणीस्तान, रशिया येथे ज्या प्रकारे लोकशाही व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहे, तशी परिस्थिती भारतात मोदी सरकारमुळे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या नेत्यांवर मंत्र्यांवर यांनी खोटे नाटे आरोप करीत गुन्हे दाखल करण्याचे आणि मालमत्ता जप्तीचे आदेश दिले आहेत. मात्र बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक असलेले संजय राऊत आणि आम्ही सर्व शिवसैनिक भाजपच्या या हुकुमशाहीला घाबरणार नाहीत, यांच्या समोर झुकणार नाहीत, भाजपा विरुध्द रस्त्यावर उतरुन आम्ही मुकाबला करु, आमच्यावर कितीही गुन्हे दाखल करा. तुंरुगांत टाका आम्ही मागे हटणार नाही. आता जनतेनेच यांच्या दमनशाही विरुध्द रस्त्यावर यावे, असे आवाहन सुध्दा महेश मिस्तरी यांनी केले.
Join Our WhatsApp Community