देहविक्री करणाऱ्या तृतीयपंथींयांचा वाढतोय उपद्रव

146

देहविक्रीचा धंदा करणाऱ्या तृतीयपंथीयांचा उपद्रव मुंबईत वाढतच आहे. या तृतीयपंथीयांनी मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत आपले अड्डे तयार केले आहेत. मातोश्रीपासून हाकेच्या अंतरावर तिवरांच्या जंगलात देहविक्री करणाऱ्या या तृतीयपंथीयांनी कांजूरमार्ग पूर्व, मालाड मालवणी, खार लिकिंग रोड सह ठाणे नवी मुंबईतील निर्जन ठिकाणावर आपले बस्तान मांडले आहे.

( हेही वाचा : दुकानांच्या पाट्यांवरील नावे मराठीत ठसठशीत अक्षरात लिहा; महापालिकेचे दुकान,आस्थापनांना निर्देश! )

स्थानिकांचा आरोप

वांद्रे कलानगरपासून २०० मीटर अंतरावर असलेले तृतीयपंथीयांच्या देहविक्रीचे ठिकाण ‘हिंदुस्थान पोस्ट’ने उघडकीस आणले आहे. पश्चिम उपनगरातील मालाड मालवणी या परिसरात रात्री महिलांच्या वेशात हे तृतीयपंथी बसथांबे, निर्जन ठिकाणी उभे राहतात. येणाऱ्या-जाणाऱ्या पुरुषांना आकर्षित करण्यासाठी हे तृतीयपंथीय अश्लील हावभाव करीत असतात, मात्र त्याचा येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना होत आहे. मालवणी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी करून देखील पोलीस कारवाई करीत नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

खार येथील लिंकिंग रोड, एस.व्ही रोड हा परिसर उच्चभ्रू मानला जातो, या ठिकाणी रात्री १२ वाजल्यानंतर देहविक्री करणारे तृतीयपंथी रस्त्याच्या आडोशाला उभे असतात. कांजूरमार्ग पूर्वेतील जोगेश्वरी लिंक रोड येथील तिवरांच्या झाडीत तृतीयपंथीयांनी आपला अड्डा तयार केला आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात तृतीयपंथी देहविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे समोर आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.