केंद्र सरकारची ६०० हून अधिक सोशल मीडिया अकाउंट्स हॅक!

106

अलिकडच्या काळात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सामान्य माणसे हॅकिंगपासून सुरक्षित नाहीच परंतु आता सरकारी सोशल मीडिया अकाऊंट सुद्धा हॅकरपासून सुरक्षित नाहीत. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारची ६०० हून अधिक सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाली आहेत अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी संसदेत दिली आहे.

( हेही वाचा : आरोग्य आणि पर्जन्य जलवाहिन्यांच्या आठ प्रस्तावांना महापालिका प्रशासकांची मान्यता )

641 सरकारी खाती हॅक

अधिकृत ट्विटर हँडल आणि ई-मेल खाते हॅक झाल्याबद्दल सरकारला एक प्रश्न विचारण्यात आला होता, ज्याच्या उत्तरात अनुराग ठाकूर यांनी भारतीय संगणक आपत्कालीन प्रतिसाद दलाने (CERT-In) दिलेल्या माहितीच्या आधारे संसदेत माहिती दिली. त्यांनी सांगितले की 2017 पासून आतापर्यंत अशी सुमारे 641 खाती हॅक झाली आहेत. लोकसभेत एका लेखी उत्तरात ठाकूर यांनी सांगितले की, 2017 मध्ये एकूण 175 खाती हॅक झाली होती, तर 2018 मध्ये ही संख्या 114 वर आली आहे. तर 2019 मध्ये हॅकिंगची संख्या 61 राहिली. पण 2020 मध्ये पुन्हा हॅकिंगची संख्या 77 वर पोहोचली. एका वर्षानंतर, 2021 मध्ये, हॅक झालेल्या सरकारी अॅप्सची संख्या 186 वर पोहोचली. त्याच वर्षी 2022 मध्ये आतापर्यंत 28 सरकारी सोशल मीडिया अकाउंटवर बंदी घालण्यात आली आहे.

तसेच सायबर हॅकिंग कसे मजबूत करावे या प्रश्नाला उत्तर देताना ठाकूर म्हणाले की, सायबर सुरक्षा वाढविण्यासाठी सीईआरटी-इनची स्थापना करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.