‘काका मला वाचवा अशा आर्त हाका दिल्लीत ऐकू आल्या’, मनसेचा पवारांना खोचक टोला!

166

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणली आहे. या प्रकरणात बुधवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावरुन आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शरद पवारांना खोचक टोला लगावला आहे. पुतण्याला वाचवण्यासाठी पवार दिल्लीत गेल्याचे देशपांडे यांनी ट्वीट करत म्हटले आहे.

देशपांडेंचा पवारांना टोला

“1773 साली “काका मला वाचवा” अशा आर्त हाका शनिवार वाड्यात लोकांनी ऐकल्या होत्या. थोड्याश्या वेगळ्या संदर्भात”माझ्या पुतण्याला वाचवा”अशा आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या,” असे म्हणत संदिप देशपांडे यांनी पवारांना टोल लगावला आहे.

( हेही वाचा: तर महाराष्ट्र, तामिळनाडूसह काही राज्यांत श्रीलंकाप्रमाणे आणीबाणी लागेल! )

मोदींसोबत नेमकी काय चर्चा झाली

संदीप देशपांडे यांच्या प्रतिक्रियेला पार्श्वभूमी आहे ती ईडी कारवाईची. महाराष्ट्रात  ईडीने महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना दणका देत कारवाई केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती देखील ईडीने जप्त केली. अशीच कारवाई अजित पवार यांच्यावर होऊ नये त्याआधी शरद पवार यांनी मोदींची भेट घेऊन माझ्या पुतण्याला वाचवा असे मोदींना सांगितल्याचे संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षरित्या सुचवले. राज्यात ईडी कारवाईचा धडाका सुरू आहे. राऊतांवर झालेल्या कारवाईला 24 तास उलटत नाहीतर पवारांनी मोदींची भेट घेतली. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. पण, मोदींसोबत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत पवारांनी स्वतः माहिती दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.