गाडी चालवत आहात? तर गडकरींनी दिलेली ही माहिती वाचाच

142

रस्ते अपघातात मृत्यू होण्याच्या सर्वाधीक घटना भारतात झाल्याचे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांनी 6 एप्रिलला लोकसभेत सांगितले. रस्ते अपघातात मृत्यू होण्याच्या बाबतीत भारत जगात अव्वल आहे. राज्यसभेत एका प्रश्नाला लेखी उत्तर देताना गडकरी यांनी हे स्पष्ट केले आहे.

भरपाईसाठी समिती स्थापन

रस्त्यावर झालेल्या अपघातग्रस्तांना भरपाई देण्यासाठी एक स्थायी समिती स्थापन करण्यात आली आहे. रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनानुसार, मंत्रालयातील संयुक्त सचिव अमित वरदान यांची समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

( हेही वाचा: एक विषाणू आणि तीन सरकारी यंत्रणांचा गोंधळ! )

मृत्यू झाला तर…

तसेच, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, अशा प्रकरणांमध्ये गंभीर जखमी झालेल्यांना देण्यात येणा-या नुकसान भरपाई रक्कम 12 हजार 500 रुपयांवरुन 50 हजार रुपयांपार्यंत वाढवली आहे. तसेच, जर मृत्यू झाला तर ही रक्कम 25 हजार रुपयांवरुन 2 लाख रुपये करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.