आम आदमीसाठी ‘आप’ रस्त्यावर! प्रस्थापितांना टक्कर देण्याची रणनीती 

100

महाराष्ट्राच्या भूमीतून उदयास आलेल्या आम आदमी पक्षाला महाराष्ट्रात विशेष यश मिळवता आले नाही, पण दिल्ली पाठोपाठ पंजाब ही दोन राज्ये ‘आप’ने ताब्यात घेतली आहेत. त्यामुळे साहजिकच ‘आप’ला पुन्हा महाराष्ट्र खुणावू लागला आहे. त्याकरता मुंबई महापालिका निवडणूक हे निमित्त ठरले आहे. यानिमित्ताने आम आदमी पक्षाने जनमानसात चर्चेत येण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. त्यासाठी आम आदमी पक्षाने मुंबई महानगर पालिका मुख्यालयासमोर मोठ्या संख्येने जमून निदर्शने केली.

आम आदमी पक्षाला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही आपले अस्तित्व निर्माण करायचे आहे, त्यानंतर राज्याच्या विधानसभेत जागा निर्माण करायची आहे. त्याकरता प्रस्थापित पक्षांना शह देण्याची तयारी ‘आप’ने सुरु केली आहे. त्यासाठी ‘आप’ने आतापासूनच हालचालीला सुरुवात केली आहे. त्याचा पहिला प्रयोग म्हणून पक्षाने आझाद मैदानात आंदोलन केले. कोरोना महामारीमुळे झळ सोसत असलेले नागरिक आता इंधन दर वाढीमुळे पिचले आहेत. केंद्र सरकार व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सर्व सामान्यांच्या खिशावर एक प्रकारे टाकलेला हा दरोडाच आहे. केंद्र सरकारने तिजोरी भरण्यासाठी ही दरवाढ केली असल्याने केंद्रातील भाजपा सरकार व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने मुंबई महानगर पालिका मुख्यालयासमोरील जंक्शनवर चक्का जाम करत रस्ता रोको करण्यात आला.

(हेही वाचा ‘मातोश्री’नंतर ‘एम ताई’, ‘केबलमॅन’! यशवंत जाधवांच्या डायरीत दडलंय काय?)

इंधन दरवाढीचा सामना करावा लागतोय

सततच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे देशातील आणि पर्यायाने मुंबईतील नागरीक त्रस्त झालेले आहेत. केंद्रातील भाजपा सरकार व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोरील जंक्शनवर आंदोलन करण्यात आले असून शेकडोच्या संख्येने आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित राहिले. त्यांनी ‘मोदी सरकार हाय हाय..’च्या घोषणांनी महानगरपालिका मुख्यालयासमोरील जंक्शनचा परिसर दणादणून सोडला. निषेधाचाच एक भाग म्हणून हातगाडीवर एक दुचाकी ठेवण्यात आली होती. भाजप सरकार वास्तवापासून खूप दूर असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष रुबेन मस्करेन्हास यांनी केला. “आम्ही नुकतेच कोविड महामारीतून बाहेर आलो आहोत. कोरोनामुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. सामान्य माणसाची विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर येत असताना आम आदमीला इंधन दरवाढीचा सामना करावा लागत आहे. मुंबईत पेट्रोलचे दर अनुक्रमे १२०.५१ रूपये, तर डिझेलचे दर १०४.७७ रुपयांवर पोहोचल्या आहेत. जर आप सरकारच्या दिल्लीत पेट्रोलची किंमत १०५ रुपये असू शकते तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार इंधनाच्या किंमतीत समानता का? आणू शकत नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकाराने तात्काळ इंधन दरामध्ये समानता आणवी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि मुंबई प्रभारी प्रीती शर्मा- मेनन यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.