रेल्वे प्रवाशांची तहान भागवण्यासाठी आणि शुद्ध पाणी मिळावे याकरता काही दिवसांपूर्वी वॉटर वेंडिंग यंत्र बसवण्यात आले होते. परंतु जवळपास सर्वच स्थानकांमध्ये बसवलेली वॉटर वेंडिंग यंत्र धूळखात आहेत. परिणामी, प्रवाशांना दुकानांमधून बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते.
( हेही वाचा : महापालिका रुग्णालयांमधील कपड्यांची धुलाई आता अत्याधुनिक टनेल लाँड्रीत! )
रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना थंडगार पाणी मिळावे यासाठी आयआरसीटीसी (IRCTC) मार्फत ही यंत्र बसवण्यात आली होती. परंतु कोरोनाकाळात बंद असलेली ही सेवा आजवर सुरू झालेली नाही. काही यंत्रांची दुरावस्था झाली असून काही यंत्रे गंजली आहेत म्हणूनच प्रवाशांना अतिरिक्त पैसे खर्च करून स्थानकांवरील दुकानांमधून बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते.
वॉटर वेंडिंग यंत्र
या यंत्रातून शुद्ध पाणी हवे असल्यास ३०० मिलि लिटर पाणी प्रवाशांच्या बाटलीत हवे असल्यास एक रुपया आणि रेल्वेकडील बाटली किंवा ग्लासमध्ये पाणी हवे असल्यास दोन रुपये मोजावे लागत होते. ५०० मिली लिटर पाण्यासाठी अनुक्रमे ३ आणि ५ रुपये, एक लिटर पाण्यासाठी अनुक्रमे ५ आणि ८ रुपये, दोन लिटर पाण्यासाठी ८ आणि १२ रुपये दर निश्चित केले होते. पुढील तीन महिन्यात ही वॉटर वेंडिंग यंत्रे काही नव्या स्थानकांवर बसवण्यात येणार आहेत. असे रेल्वे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community