“राऊतांनी मला ‘सामना’ कार्यालयात धमकावले अन् 25 लाख घेतले”

138

राज्यातील वातावरण केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून चांगलंच रंगलं आहे. दरम्यान, यावरून शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार वाद पेटला असून दोन्ही राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतांना दिसत आहेत. बुधवारी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली. या जप्तीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. अशा परिस्थितीत भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांच्यावर खळबळजनक आरोप करून हल्लाबोल केला आहे.

(हेही वाचा – भाजपाला मोठं खिंडार! ५० कार्यकर्त्यांनी बांधलं शिवबंधन)

कंबोज यांनी राऊतांवर केले गंभीर आरोप

भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ट्विटवर मोहित कंबोज यांनी एक व्हिडीओही जारी केला असून त्यामध्ये त्यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

काय म्हणाले मोहित कंबोज?

मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले की, ‘ 2014 साली सामनाच्या कार्यालयात संजय राऊत यांनी मला धमकावले आणि पंचवीस लाख रुपये घेतले आहेत. ते अद्याप परत केले नाहीत. या प्रकरणात माझ्याकडे पुरावे आहेत, मी तक्रारही करत आहे. मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार का?’ मोहित कंबोज यांनी संजय राऊत यांनी मला धमकावून 25 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच संजय राऊत यांच्याविरोधात मी गुन्हा दाखल करणार आहे. मुंबई पोलीस गुन्हा दाखल करणार का? असा सवालही आपल्या ट्विटमधून मोहित कंबोज यांनी व्हिडीओच्या अखेरीस उपस्थित केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.