मालगाडी चालकांची १० ते १२ तासाची ड्युटी असताना ४८ तास वाढल्याने रेल्वे प्रशासनाला सांगूनही लक्ष दिले नसल्याने कल्याण रेल्वे यार्डात बुधवारपासून सुमारे २५० कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. कामाचे तास पूर्वीप्रमाणे करत नाही तोपर्यत संप मागे घेणार नाही अशी भूमिका संपकऱ्यांनी घेतली आहे. मात्र ३६ तास उलटूनही संप मिटला नसल्याने संपकऱ्यांच्या नजरा रेल्वे प्रशासनाच्या निर्णयाकडे लागल्या आहेत.
४० तास काम होत असल्याने संप
या संपात मालगाडी चालक, सहाय्यक चालक, लोको पायलट ट्रेन मॅनेजर, गुड्स मोटरमन सहभागी झाले होते. कल्याण रेल्वे यार्डात सुरु असलेल्या संपात संपकरी आपल्या मागण्या डिव्हीजन मॅनेजरकडे मांडल्या होत्या. मात्र आपल्या मागण्यांकडे लक्ष दिले नसल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांना संप पुकारावा लागला. कल्याण रेल्वे यार्डातून पनवेलकडे दिवसातून ४० मालगाड्या धावतात. या कामाचे १० ते १२ तास होत असत. मात्र प्रायोगिक तत्वावर कल्याण ते पनवेल पर्यत मालगाड्यांचा प्रवास आता पुढे ट्रोम्बे, मुलुंड, तुर्भे, वडाला, वसईपर्यत त्याच मालगाडी चालकाने नेणे बंधनकारक करण्यात आले. त्यामुळे ४० तास काम होत असल्याने हा कर्मचाऱ्यांवर लादलेला नियम अन्यायकारक असल्याचा आरोप संपकऱ्यांनी केला आहे.
( हेही वाचा : Railway Recruitment: रेल्वेत नोकरी करायची इच्छा आहे? तर लवकर करा अर्ज )
याबाबत कर्मचाऱ्यांचा विचारले असता ते म्हणाले, डिव्हीजन मॅनेजर हे दररोज कल्याण रेल्वे यार्ड कार्यालयात येतात. मात्र आम्हाला कोणतेही उत्तर दिले जात नाही.आमच्या कामाचे तास पूर्वीप्रमाणे करावे एवढीच आमची मागणी असताना रेल्वे प्रशासन कर्मचाऱ्यांना जास्त तास का राबवून घेत आहेत याचे उत्तर मात्र देत नाही. कल्याण रेल्वे यार्डातून सुटणाऱ्या मालगाड्या संपामुळे बाहेर पडू शकत नसल्याने रेल्वेचे नुकसान होत आहे. दरम्यान एसटी कामगारांचा बेमुत संप मिटला नसून त्यात आता रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप सुरु झाल्याने सरकारने संपकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे अशी समस्त जनतेची मागणी आहे.
Join Our WhatsApp Community