मनसेला झटका! महाराष्ट्रातले मनसेचे एकमेव नगराध्यक्ष वैभव खेडेकरांवर अपात्रतेची कारवाई

190

राज ठाकरेंच्या मनसे पक्षाला एक मोठा झटका मिळाला आहे. महाराष्ट्रातले मनसेचे पहिले आणि एकमेव नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांना राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी अपात्र ठरवले आहे. खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकरांवर केलेली कारवाई ही मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

तक्रारीवरुन कारवाई केली गेली

शिवसेनेचे गटनेते प्रज्योत तोडकरांनी वैभव खेडेकरांवर डिझेल चोरी, नगरपालिका हद्दीतील वृक्षतोड आणि नियमबाह्य बिले काढणे असे आरोप केले होते. यासंदर्भात नगरविकास खात्याकडे तक्रार केल्यानंतर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वैभव खेडेकरांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवले आहे.

( हेही वाचा: कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरण अधिक तीव्र होणार? )

वैभव खेडेकर काय म्हणाले

निलंबनाची कारवाई झाल्यानंतर, वैभव खेडेकर यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला सांगितले की, मला नगरविकास खात्याची ऑर्डर व्हाॅट्सअॅपवर आली. महाराष्ट्रातल्या राजकारणात दिसतो आहे की स्थर किती खाली गेलेला आहे. आता या कारवाईनंतर मलाही याठिकाणी तो स्थर खाली गेल्याचे दिसून येत आहे. मला अपात्र ठरवण्याची कारवाई केली जाणार हे मला माहिती होते, कारण मी शिवसेनेत प्रवेश करावा यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले पण मी शिवसेनेत जात नाही म्हटल्यानंतर अशा पद्धतीचा राजकीय निर्णय याठिकाणी घेण्यात आला, असे वैभव खेडेकर म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.