शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्राप्तीकर विभागाने यशवंत जाधव यांच्या आणखी 41 संपत्ती जप्त केल्या आहेत. यामध्ये भायखळा येथील फ्लॅट्स, हाॅटेल आणि वांद्र्यातील एका फ्लॅटचा समावेश आहे. या प्रकरणात लवकरच सक्तवसुली संचलनालयाची एंट्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यशवंत जाधव यांच्याभोवती कारवाईचा फास आवळताना दिसत आहे.
मालमत्तांवर टाच
या मालमत्तांमध्ये त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांच्याशी संबंधित मालमत्तांवरही कारवाई झाली आहे. जप्त केलेल्या 41 मालमत्तांमध्ये बिल्कवडी चेंबर बिल्डींगमधील 31 फ्लॅट, भायखळा येथील इंपिरिकल क्राऊन हॉटेल आणि वांद्रे येथील एका फ्लॅटचा समावेश असल्याचे समजते आहे. यशवंत जाधव यांनी महापालिकेत ज्या कंपन्यांना कंत्राट दिली त्याचीही आयकर विभागाने चौकशी केली.
( हेही वाचा: मनसेला झटका! महाराष्ट्रातले मनसेचे एकमेव नगराध्यक्ष वैभव खेडेकरांवर अपात्रतेची कारवाई )