किरीट सोमय्या सतत शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांवर आरोप करत असतात. सध्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात चांगलीच खडाजंगी रंगली आहे. त्यातच आता सोमय्यांच्या रडारवर नवे मंत्री आले आहेत. सोमय्यांनी दिल्लीत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्याकडे सूचक इशारा केला आहे. ईडीकडून कारवाई होणा-या नेत्यांमध्ये आता पुढचा क्रमांक हसन मुश्रीफ यांचा असणार आहे.
सोमय्यांचा सूचक इशारा
हसन मुश्रीफ यांनी जनतेला लुटून मोठी माया जमवली आहे. हे पैसे कुठे लपवलेत? त्यांच्या 158 कोटींच्या घोटाळ्याचे पुरावे तर मी दिलेच आहेत. यावर आता त्यांना उत्तर द्यावे लागले. त्यामुळे आगामी काळात हसन मुश्रीफ यांनी सांभाळून राहावे. काही आठवड्यानंतर ‘साले’ तर आहेतच, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांच्या या वक्तव्याचा रोख रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या दिशेने होता.
( हेही वाचा नितेश राणे यांचे महापालिका प्रशासकांना पत्र: मागील भ्रष्टाचारी सत्ताधारी सेनेच्या कार्यपध्दतीचा अवलंब नको! )
जाधवांच्या मालमत्तांवर टाच
शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्राप्तीकर विभागाने यशवंत जाधव यांच्या आणखी 41 संपत्ती जप्त केल्या आहेत. यामध्ये भायखळा येथील फ्लॅट्स, हाॅटेल आणि वांद्र्यातील एका फ्लॅटचा समावेश आहे. या मालमत्तांमध्ये त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांच्याशी संबंधित मालमत्तांवरही कारवाई झाली आहे. जप्त केलेल्या 41 मालमत्तांमध्ये बिल्कवडी चेंबर बिल्डींगमधील 31 फ्लॅट, भायखळा येथील इंपिरिकल क्राऊन हॉटेल आणि वांद्रे येथील एका फ्लॅटचा समावेश