Mosque Loudspeaker Row: राज ठाकरेंच्या सभेआधीच मनसेच्या कार्यालयावर दगडफेक

120

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर जाहीर सभा घेतली. या सभेतील भाषणादरम्यान, त्यांनी मशिदींवरील भोंग्यांसंदर्भात वक्तव्य केले आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. या सभेनंतर येत्या 12 एप्रिल रोजी राज ठाकरे ठाण्यात सभा घेणार आहेत. या वक्तव्यानंतर मुंब्र्यातील तन्नवर नगर परिसरातील मनसेच्या वाहतूक सेना ‘राजगड’ या कार्यालयावर दगडफेक करण्यात आल्याची माहिती समोर आली नाही.

फलक काढण्यासाठी राष्ट्रवादीने दिला मनसेला इशारा

दोन दिवसांपूर्वी मनसेच्या वाहतूक सेना ‘राजगड’ या कार्यालयावर लावलेला फलक उतरवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून रात्री बारा वाजेपर्यंत कालावधी देण्यात आला होता. हा फलक काढला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने फलक काढू मग कोणतीही कारवाई झाली तरी चालेल असा इशारा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अय्याज बबलू यांनी दिला होता.

(हेही वाचा – पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी देणारा निघाला मनोरुग्ण!)

अज्ञातांनी दगड फेक करुन मनसेचा फलक फाडला

हा प्रकार घडल्यानंतर मुंब्रा येथील मनसे वाहतूक शाखा अध्यक्ष इरफान सय्यद यांनी मनसे वरिष्ठ पदाधिकारी आणि मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी कुठलाही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सतर्कता दाखवत मनसे वाहतूक शाखा या कार्यालयाच्या ठिकाणी कडक बंदोबस्त होता. तसेच राष्ट्रवादीच्या संबंधीत कार्यकर्त्यांना 148 अंतर्गत नोटीसदेखील बजावल्या होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मनसेचा हा फलक उतरवता आला नव्हता. मात्र वातावरण शांत झाल्यानंतर पोलिसांची पाठ फिरताच काही अज्ञात इसमांनी दगड मारून हा मनसे पक्षाचा फलक फाडण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.