मागच्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एकमेकांवर आरोपांची सरबत्ती लावली जात आहे. गेल्या अनेक दिवसांत आरोप प्रत्यारोपांची राळ उठत आहे. सध्या संजय राऊत ईडीच्या रडारवर आहेत त्यांची मालमत्ताही जप्त केली आहे. पण या नेत्यांची संपत्ती आहे तरी किती ते जाणून घेऊया.
असोसिएट फाॅर डेमोक्रेटिक या वेबसाईटवर नेत्यांची संपत्ती आणि दाखल केलेल्या केसेसबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. या साईटवर मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही नेते कोट्याधीश आहेत. या मालमत्तेत घर, जमीन, गाड्या, दागिने आणि गुंतवणुकीचा समावेश आहे.
राऊतांची संपत्ती
2004 साली संजय राऊत पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार झाले. तेव्हा प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे 48 लाख 94 हजार 167 रुपयांची संपत्ती होती. 2016 साली राऊत पुन्हा खासदार झाले तेव्हा त्यांची संपत्ती 1 कोटी 51 लाख 228 रुपये इतकी होती. सध्या राऊत यांच्यावर 14 केसेस दाखल आहेत. त्यांच्याकडे 1 कोटी 18 लाख 76 हजार 316 इतकी स्थावर मालमत्ता आहे. तसेच, त्यांच्या नावावर 32 लाख 27 हजार 289 रुपये इतकी जंगम मालमत्ता आहे.
( हेही वाचा: भर उन्हाळ्यात निघणार घामाच्या धारा! महाराष्ट्रावर लोडशेडींगची टांगती तलवार )
कोट्याधीश किरीट सोमय्या
2004 साली किरीट सोमय्यांनी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 2 कोटी 25 लाख 9 हजार 249 रुपयांची संपत्ती होती. 2009 ला त्यांच्याकडे 4 कोटी 78 लाख 81 हजार 269 रुपयांची मालमत्ता होती. 2014 ला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 7 कोटी 21 लाख 56 हजार 258 रुपयांची संपत्ती होती. सध्या किरीट सोमय्यांकडे दीड कोटी स्थावर तर साडे पाच कोटींची जंगम मालमत्ता आहे.