राज्यातील लावण्यात आलेले निर्बंध 1 एप्रिलपासून शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची आता मास्कमुक्त राज्याकडे वाटचाल होत असल्याचं चित्र आहे. असं असलं तरी उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोविड नियमांचं काटेकोर पालन करत असतात. संपूर्ण कोविड काळात नेहमीच अजित दादांच्या तोंडावर मास्क असल्याचं दिसून आलं.
पण अखेर शुक्रवारी त्यांनी आपल्या तोंडावरुन मास्क बाजूला सारला आहे. बीड येथे बोलत असताना, सासुरवाडीत आल्यानंतर त्यांचं ऐकावं लागतं असं मिश्कीलपणे म्हणत अजित पवार यांनी मास्क काढत भाषण केलं आहे.
(हेही वाचाः राऊतांनी शिवसेना सोडली?)
खरंतर मी ऐकत नाही पण…
संपूर्ण कोविड काळात अजित पवार यांनी सार्वजनिक ठिकाणी कधीही आपल्या तोंडावरुन मास्क खाली उतरवला नाही. आपल्या कृतीतून कायमंच त्यांनी लोकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं. त्यांच्या या वागण्यामुळे एक आदर्श नेता म्हणून त्यांचं महाराष्ट्राने कौतुक केलं. पण शुक्रवारी बीड येथील पक्षाच्या एका कार्यक्रमात त्यांना लोकांनी मास्क काढण्याची विनंती केली. त्यावेळी अजित पवार यांनी चक्क आपल्या तोंडावरुन मास्क काढून भाषण केलं. मला कोणी मास्क काढायला सांगितलं तर मी ऐकत नाही. पण मराठवाडा माझी सासुरवाडी असल्यामुळे सासरकडच्या मंडळींचं ऐकावं लागतं, असं मिश्कील विधान करत अजित पवार यांनी मास्क काढत भाषण सुरू केलं.
(हेही वाचाः ‘मी शरद पवारांचा माणूस आहे’, संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं)
मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक
कोविड काळात नियमांचं पालन न करणा-या अनेक नेत्यांना सुद्धा अजित पवार यांनी वेळोवेळी फटकारलं. 1 एप्रिलपासून राज्यातील निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर सुद्धा अजित पवार सार्वजनिक ठिकाणी आपल्या तोंडावरुन कधीही मास्क काढलं नाही. त्यांच्या या कृतीचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नुकतंच कौतुक केलं. गुढीपाडव्याच्या दिवशी राज्य सरकारने केलेल्या उद्घाटन कार्यक्रमात तोंडावर मास्क केवळ मी आणि अजित पवार यांनीच घातले आहेत, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी लोकांना मास्क वापरण्याचं आवाहन केलं होतं.
(हेही वाचाः राज ठाकरेंची ‘या’ तारखेला होणार ‘उत्तरसभा’)
Join Our WhatsApp Community