भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता पोलिसांनी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांना समन्स बजावले आहे. शनिवार 9 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे या समन्समध्ये म्हटले आहे.
पोलिसांचे समन्स
आयएनएस विक्रांत युद्धनौकेला वाचवण्यासाठी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांनी लोकांकडून पैसे गोळा करुन त्याचा गैरवापर केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. या प्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या विरोधात गुरुवारी ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात गु्न्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्याची चौकशी करण्यासाठी आता ट्रॉम्बे पोलिसांकडून सोमय्या पिता-पुत्रांना समन्स बजावण्यात आले आहे. 9 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश त्यात देण्यात आले आहेत.
सोमय्यांचा भ्रष्टाचार- राऊत
किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी सर्वसामांन्यांकडून पैसे उकळले आहेत. हे पैसे राजभवनाकडे सुपूर्द केले जातील, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं होतं. पण राजभवनापर्यंत ते पैसे पोहोचले नसल्याचं राजभवनाकडून सांगण्यात आलं आहे. ते पैसे किरीट सोमय्या मुलुंडला निलम नगर येथे गेले. या पैशांचं पीएमसी बँकेच्या माध्यमातून मनी लाँड्रिंग करण्यात आल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
Join Our WhatsApp Community