शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला हा कट… राऊतांचा आरोप

217

एसटीचे आंदोलन अधिक चिघळल्याचे दिसत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे. पवारांच्या घरावर हल्ला करणारे एसटी कर्मचारी नाहीत, तर हल्ल्यामागे अतृप्त आत्म्यांचा हात आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

आणि आम्हाला भाषा शिकवतात

राज्यातील वकील सतीश उके यांच्यावरच्या कारवाईने यांना आनंद होतो. पण मुंबईतील एक वकील सदावर्ते याच्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर यांना त्रास होतो. दोघेही वकील आहेत. दोघांना समान न्याय पाहिजे. महाविकास आघाडीतील माननीय पवार साहेबांवर टीका करतात आणि आम्हाला भाषा विचारतात. तर आमची भाषा ही अशीच असणार असा टोला राऊतांनी भाजपाला लगावला आहे.

( हेही वाचा :रविवारी पनवेल-वाशी रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक )

राऊतांच्या निशाण्यावर सोमय्या

आयएनएस विक्रांत युद्धनौकेसाठी गोळा केलेले 58 कोटी रुपये घशात घातल्याचा आरोप असलेल्या किरीट सोमय्यांवर संजय राऊत यांनी पुन्हा हल्ला चढवला आहे. सध्या सोमय्या हे अंडर ग्राऊंड झाले आहेत. ते पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देत नाहीत. ते भूमिगत झाले आहेत. हे दोघेही अॅंटीसिपेटरी बेलसाठी गेले असल्याची माहिती मिळाली आहे. पण अशी जामिनासाठी तर चोर, डकैत जातात. देशद्रोही जात नाहीत. आता ते ही होऊ लागल्याचे राऊतांनी म्हटले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.