रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन किनारपट्टीवरील हारवित गावाच्या समुद्राच्या खाडीपट्टीवर शुक्रवारी महाकाय माशाचा मृतदेह आढळून आला. ब्राएड प्रजातीचा व्हेल माशाचा मृतदेह किनारपट्टीवर आढळून आल्याची माहिती वनविभागाच्या कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी दिली.
( हेही वाचा : धक्कादायक! एकाच वेळी 6 मैत्रिणींनी विषं खाल्लं, कारण वाचून थक्क व्हाल )
३० फूट लांबीच्या व्हेल माशाचा मृतदेह
भरतीच्या पाण्यासोबत हा महाकाय मासा किनारपट्टीपर्यंत पोहोचला. तो किनारपट्टीवर पोहोचण्यापूर्वीच जखमी अवस्थेत दिसून येत होता. त्याच्या हालचालीही दिसून येत नसल्याने तो अगोदरच मेला असावा, असा अंदाज त्यांनी बांधला. अंदाजे ३० फूट लांबीच्या व्हेल माशाचा मृतदेह किनारपट्टीला समुद्राच्या पाण्यातून वाहत आला. या व्हेल माशाच्या मृत्यूचे कारण मात्र वनविभागाच्या कांदळवन कक्षाकडून समजलेले नाही. माशाच्या मृतदेहाची कशा पद्धतीने विल्हेवाट लागली, ही माहिती अद्याप कांदळवन कक्षाकडून दिली गेलेली नाही.
Join Our WhatsApp Community