म्हाडा वसाहतींसाठी मुद्रांक शुल्काचे धोरण बदलणार?

143

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी म्हाडाच्या इमारतींचा पुवर्विकास करण्यासाठी पुढे येणा-या विकासकांना एकरकमी शुल्क भरावे लागत होते त्यात ही रक्कम टप्प्याटप्प्याने भरता येईल का असे याची शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिले. मुंबईत म्हाडाच्या 56 वसाहती आहेत. मुंबई शहरातील विविध प्रश्नांबाबत वर्षा निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.

काम लवकर पूर्ण करावे

या बैठकीत उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, लोकप्रतिनीधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यासंदर्भात महसूल, वित्त व गृहनिर्माण विभागाच्या अधिका-यांनी धोरण निश्चित करावे. म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करताना, रहिवाशांना विश्वासात घेऊन काम करावे, तसेच ज्या वसाहतींचे अभिन्यासाचे काम बाकी आहे तेही येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अहवालानंतर कार्यवाही केली जाणार

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितले की, पत्राचाळीच्या पुनर्विकासासंदर्भात जाॅनी जोसेफ समितीच्या शिफारशी आणि अभिप्रायानंतर म्हाडाने विकासक म्हणून काम सुरु केले आहे. पुनर्वसन हिश्श्यातील बांधकाम दायित्वाच्या पूर्ततेबाबत सेवानिवृत्ती न्यायाधीश डी. के. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या चार सदस्यीय समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.