सोमय्या पितापुत्र चौकशीसाठी गैरहजर!

116

‘आयएनएस विक्रांत’ गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात किरीट आणि नील सोमय्यांना ट्रॉम्बे पोलिसांनी समन्स पाठवून शनिवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. मात्र दोघेही पितापुत्र चौकशीसाठी गैरहजर राहिले असून त्यांच्या वकिलाने पोलिसांना पत्र देऊन चौकशीसाठी वेळ मागून घेतली आहे.

( हेही वाचा :  शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला हा कट… राऊतांचा आरोप  )

गैरव्यवहार केल्याचा आरोप

शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचा पुत्र नील सोमया यांच्यावर आयएनएस विक्रांत वाचविण्यासाठी काढलेल्या कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता, त्यानंतर निवृत्त सैनिक बबन पाटील यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात याप्रकरणी किरीट आणि नील सोमया यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. ट्रॉम्बे पोलिसांनी याप्रकरणी किरीट आणि नील सोमय्या यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून गुरुवारी त्यांना समन्स बजावले होते. या समन्स मध्ये दोघांनाही शनिवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते.

चौकशीसाठी वेळ मागून घेतला

दरम्यान शनिवारी किरीट आणि नील ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गैरहजर राहिले असून त्यांच्या बाजूने त्यांचे वकील शनिवारी पोलीस ठाण्यात दाखल झाले व त्यांनी पोलिसांना पत्र देऊन चौकशीसाठी वेळ मागून घेतली आहे. सोमय्या यांच्या वकिलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, किरीट सोमय्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम होते, त्यासाठी सोमय्या दिल्लीला असल्यामुळे ते हजर राहू शकले नाही, आम्ही पोलिसांना पत्र लिहून चौकशीसाठी वेळ मागून घेतला असल्याचे वकिलांनी सांगितले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.