हल्लाच करायचा होता तर ‘मातोश्री’वर करायचा होता..दिलीप मोहितेंचे वक्तव्य

148

शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी शुक्रवारी हल्ला करण्यात आला. आंदोलक एसटी कर्मचा-यांनी हा हल्ला केला होता. आता यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी वक्तव्य केले आहे. एसटी कर्मचा-यांचे आंदोलन हा राज्याचा प्रश्न होता. तुम्हाला मोर्चा काढायचा होता तर मातोश्रीवर काढायचा होता मग समजली असती हल्ल्याची किंमत असे वक्तव्य मोहिते यांनी केले आहे.

काही लोकांचा विशिष्ट हेतू

राज्याचे परिवहन खाते अनिल परब यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचे मग तुम्हाला जे काय करायचे ते ज्याच्याकडे खाते आहे, तिकडे करायचे. ज्या विषयाशी राष्ट्रवादी काॅंग्रेसचा संबंध नाही, जो विषय पवार साहेब हाताळत नाहीत, त्यासाठी जाणीवपूर्वक हल्ला घडवून आणण्यामागे काही लोकांचा विशिष्ट हेतू आहे, अशी टीका मोहिते पाटील यांनी केली आहे.

( हेही वाचा: दहावी- बारावीच्या परीक्षांचे निकाल जूनमध्येच )

काय आहे प्रकरण

एसटी कर्मचाऱ्यांच्या एका गटाने शुक्रवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी जाऊन आंदोलन केलं. आंदोलक पवारांच्या घराच्या परिसरात आले असताना, त्या ठिकाणी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्याचा फायदा घेत कर्मचा-यांनी  थेट पवारांच्या घराच्या परिसरात प्रवेश घेतला आणि अगदी दरवाज्याजवळ जाऊन घोषणाबाजी सुरु केली. काही आंदोलकांनी निवासस्थानाच्या आवारात घुसून चप्पल फेक केली असल्याचे समोर आले. आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्लाबोल केल्याने पोलिसांनी ही बाब गंभीरपणे घेतली असून, त्याचा तपास सुरू केला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.