भारतीय केळी, बेबीकॉर्नची परदेश वारी!

134

भारतात उत्पादित केळी आणि बेबीकॉर्न यांना कॅनडाच्या बाजारपेठेत प्रवेश मिळण्यासंदर्भात भारताची राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना आणि कॅनडा देशातील प्रतिनिधी यांच्यातील वाटाघाटी सफल झाल्यामुळे आता या भारतीय पिकांना कॅनडाच्या बाजारपेठेमध्ये विक्रीची परवानगी देण्यात आली आहे.

देशातील शेतकऱ्यांना भारत सरकारच्या या निर्णयाचा मोठा लाभ

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण सचिव मनोज आहुजा आणि कॅनडाचे उच्चायुक्त माननीय कॅमेरॉन मॅकके यांच्यामध्ये 7 एप्रिल 2022 रोजी झालेल्या बैठकीनंतर, कॅनडाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले की, कॉर्न पिकासंदर्भात कॅनडा देशात आवश्यक असलेल्या वनस्पती संरक्षण आयात आणि देशांतर्गत व्यवहार संदर्भातील आवश्यक पात्रता तसेच स्वयंचलित आयात संदर्भ प्रणाली यांच्या बाबतीत लागू असलेल्या डी-95-28 या मार्गदर्शक सूचनांच्या अद्यायावतीकरणानंतर एप्रिल 2022 पासून कॅनडा भारतातील ताज्या बेबीकॉर्नची आयात सुरु करू शकेल.

New Project 3 8

भारताने ताज्या केळ्यांच्या संदर्भात पुरविलेल्या तंत्रज्ञानविषयक माहितीचा आधार घेऊन कॅनडाने तात्काळ प्रभावाने भारतीय केळ्यांना तेथील बाजारपेठेत विक्रीसाठी प्रवेश देण्यास परवानगी दिली आहे. केळी आणि बेबीकॉर्न ही पिके घेणाऱ्या देशातील शेतकऱ्यांना भारत सरकारच्या या निर्णयाचा मोठा लाभ होणार असून त्यामुळे भारताच्या निर्यात महसुलात देखील सुधारणा होईल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.