राष्ट्रवादीची बाजू धारधार शब्दांत मांडणारे मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड सध्या शांत आहेत, त्यांची भूमिका सध्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी वठवत आहेत. काही दिवसांपासून मनसेचे नेते अमेय खोपकर आणि मिटकरी यांच्यात वारंवार शाब्दिक खडाजंगी झाली आहे. आता खोपकर यांनी एक ट्विट केले आहे. हे ट्विट मिटकरी यांच्यावर टीका करणारे आहे, त्यामुळे पुन्हा एकदा हे ट्विट चर्चेत आले आहे.
मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी यासंबंधी ट्विटमध्ये अमोल मिटकरी यांचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वीच्या भाषणाचा व्हिडीओ टाकला आहे. त्यामध्ये खोपकर म्हणाले की,
राष्ट्रवादीचा छोटूसा भोंगा
आठवतोय का कुणाला?
अबब… केवढं ते भाषेचं तेज
पण ती सगळी निघाली बोलाचीच कढी…
असेल धमक तर पुन्हा चुरुचुरु बोलून दाखवा की राव…
पेंग्विन पण तिथेच आहे आणि मातोश्री पण तिथेच आहे…
जिजामाता उद्यानात रंग बदलणाऱ्या या सरड्यासाठी वेगळं दालन करणार आहेत म्हणे!
राष्ट्रवादीचा छोटूसा भोंगा
आठवतोय का कुणाला?
अबब..केवढं ते भाषेचं तेज
पण ती सगळी निघाली बोलाचीच कढी…
असेल धमक तर पुन्हा चुरुचुरु बोलून दाखवा की राव…
पेंग्विन पण तिथेच आहे आणि मातोश्री पण तिथेच आहे…
जिजामाता उद्यानात रंग बदलणाऱ्या या सरड्यासाठी वेगळं दालन करणार आहेत म्हणे! pic.twitter.com/uoRkiY2Ok6— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) April 8, 2022
(हेही वाचा ‘उत्तरसभे’आधी वसंत मोरे राजकीय भूमिका ठरवणार!)
खोपकर यांचे आव्हान
या व्हिडीओमध्ये मिटकरी भाषण करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका करत आहेत विशेष करून आदित्य ठाकरे यांच्या आवाजाची मिमिक्री करत आहेत. आता त्याच मिटकरी यांना खोपकर यांनी ‘असेल धमक तर पुन्हा चुरुचुरु बोलून दाखवा की राव…# पेंग्विन पण तिथेच आहे आणि मातोश्री पण तिथेच आहे…’, अशा शब्दांत आव्हान दिले आहे.
Join Our WhatsApp Community