एसटीच्या संपकरी कामगारांनी एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. हा हल्ला पूर्वनियोजित होता, कारण हल्ल्याच्या आधीच तिथे माध्यमांचे प्रतिनिधी पोहचले होते. त्याची माहिती पोलीस यंत्रणेला कशी मिळाली नाही, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. त्यासाठी मुंबई पोलीस उपायुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गोविंदबाग येथील सुरक्षा व्यवस्था वाढवली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पोलीस आयुक्त संजय पांडे, मुंबई पोलीस उपायुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे-पाटील यांची तातडीची बैठक घेतली या बैठकीत या सर्व बाबींवर चर्चा केल्यानंतर समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. विश्वास नांगरे-पाटील यांच्या नेतृत्वात चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती या सर्व प्रकरणाचा तपास करून अहवाल गृहमंत्र्यांना देणार आहे. पवार कुटुंबीय तसेच सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. खासदार सुळे यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुंबई पोलिसांच्या पीएसयूवर असेल. मुंबई पोलिसांचे एक वाहन आणि दोन अधिकारी त्यांच्या सुरक्षेत तैनात असतील. सिल्व्हर ओक तसेच बारामतीमधील गोविंदबाग येथील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. 8 एप्रिलला दुपारी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. यावेळी जमाव आक्रमक होऊन पवार यांच्या घरावर दगड, चप्पल फेकही केली होती.
(हेही वाचा महाराष्ट्राच्या ‘या’ आमदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल!)
Join Our WhatsApp Community