अविश्वास प्रस्ताव मंजूर करून इम्रान खान यांचे सरकार उलथून टाकल्यानंतर आता विरोधी पक्षाच्या वतीने शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानपदासाठी उमेदवारी अर्ज केला आहे. त्यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे, कारण इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक ए इन्साफ (PTI) या पक्षाकडून शाह महमूद कुरैशी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत. सध्याच्या स्थितीत बहुमताचा आकडा विरोधकांच्या बाजूने असल्याने शाहबाज शरीफ हेच पंतप्रधानपदी विराजमान होणार आहे. यानिमित्ताने शहाबाज यांचे वैयक्तीक आयुष्य चांगलेच चर्चेत आले आहे.
कोण आहेत शाहबाज?
शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ आहेत. 2018 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पीएमएल-एनने शाहबाज यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले होते. इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ या निवडणुकीत विजयी झाला. त्याचवेळी शाहबाज यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. शाहबाज पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.
(हेही वाचा पवारांच्या बंगल्यावरील हल्ला भोवला, १०९ एसटी कामगारांनी नोकरी गमावली)
कधी आणि कोणासोबत केले निकाह?
- शाहबाज यांचे लग्न, पत्नी आणि कुटुंबाबाबत अनेक प्रकारच्या कथा सांगितल्या गेल्या आहेत. शाहबाज यांनी 5 निकाह केले आहेत.
- पहिली पत्नी बेगम नुसरत शाहबाज यांना 5 मुले आहेत. शाहबाजचा पहिला निकाह त्याची चुलत बहिण बेगम नुसरत हिच्यासोबत झाला होता. त्यांचा निकाह 1973 मध्ये झाला होता. 1993 मध्ये नुसरतचा मृत्यू झाला.
- त्यानंतर शाहबाज यांनी दुसरा निकाह केला. शाहबाजने सौदी अरेबियात आलिया हनीसोबत गुपचूप निकाह केल्याचे बोलले जात आहे. ही बाब समोर आल्यानंतर त्यांनी आलियाला घटस्फोट दिला.
- शाहबाज यांच्याशी निकाह करण्यापूर्वी तेहमीना दुर्रानी यांचे माजी मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल गुलाम मुस्तफा खार यांच्याशी निकाह झाला होता. गुलाम मुस्तफा यांच्याशी असलेल्या खराब संबंधांमुळे त्यांनी 14 वर्षांचा निकाह मोडला.
- याशिवाय शाहबाज यांनी नर्गिस खोसा, कलसुम हाई यांच्याशीही निकाह केला.