राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी हवे होते. तसे झाले असते तर चित्र वेगळे राहिले असते, असे विधान राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. शरद पवारांच्या अमरावती दौऱ्यादरम्यान त्यांनी हे विधान केले असून त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेय.
राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रविवारी अमरावती दौऱ्यावर होते. स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवार यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर एकाच व्यासपीठावर होते. यावेळी ठाकूर म्हणाल्या की, शरद पवार आपण जर मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचे चित्र जरा वेगळे असते, यशोमती ठाकुर यांच्या वक्तव्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस असल्याचे अधोरेखित झाले. तसेच भर सभेत यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालत आहे, असेही ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
(हेही वाचा पवारांच्या बंगल्यावरील हल्ला भोवला, १०९ एसटी कामगारांनी नोकरी गमावली)
Join Our WhatsApp Community