22 मार्चपासून सुरु झालेली पेट्रोल डिझेलची दरवाढ अद्याप थांबलेली नाही. त्यामुळे आता लोकांनी आपला मोर्चा ईलेक्ट्रीक वाहनांच्या दिशेने वळवला आहे. 2021-22 या गेल्या आर्थिक वर्षात, देशातील इलेक्ट्रीक वाहनांच्या किरकोळ विक्रीने चार लाख युनिट्सा टप्पा ओलांडला. ईव्ही विक्रीत दुचाकी क्षेत्राचा सर्वाधिक वाटा आहे.
विक्री तिपटीने वाढली
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएन ऑफ इंडियाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 2020-21 च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये इलेक्ट्रिक वाहनांची एकूण किरकोळ विक्री तिपटीने वाढून 4 लाख 29 हजार 217 युनिट्सवर गेली आहे.
( हेही वाचा: सावधान! विनाकारण हाॅर्न वाजवताय? पोलीस घेणार तुमची शाळा )
अव्वल विक्री
सध्या ईलेक्ट्रिक वाहनांची विक्री तीन पट आहे. या विक्रीत देशातील वाहन कंपनी टाटा मोटर्स 15,198 युनिट्सच्या किरकोळ विक्रीसह आघाडीवर आहे. तिचा बाजार हिस्सा 85.37 टक्के राहिला आहे. इलेक्ट्रिक टू व्हीलर विक्री मागील आर्थिक वर्षात 41 हजार 46 युनिट्सवकरुन पाच पटीने वाढून 2 लाख 31 हजार 338 युनिट्स झाली. हिरो इलेक्ट्रिक टू व्हिलर सेगमेंटमध्ये 65,3030 युनिट्सच्या विक्रीसह अव्वल स्थानावर राहिली आहे. कंपनीचा बाजार हिस्सा 28.23 टक्के होता.
Join Our WhatsApp Community