आता डेबिट कार्डशिवाय ATM मधून काढता येणार पैसे!

183

देशात डिजिटलाझेशनचे युग आले आणि बँकिंग क्षेत्रात वेगवान बदल झाल्याचे दिसून आलेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात डिजिटलायझेन आणखी वाढल्याचे दिसून आलेत. काही वर्षांपूर्वी पैसे बँकेतून काढायचे म्हणजे बँकेत जावे लागत होते. त्यानंतर एटीएम कार्ड आले. याकरता डेबिट/रुप-वे कार्डचा वापर केला जाऊ लागला. पण आता बँकेतून पैसे काढणं अगदी सोपं होणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण एटीएममधून पैसे काढण्यासाठी कोणत्याही कार्डची गरज भासणार नसून देशात आता कार्डशिवाय पैसे काढता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीआयने त्यासाठी पावले उचलली आहेत. कोणत्याही बँकेच्या एटीएममधून यूपीआयच्या माध्यमातून पैसे काढता येणार आहेत.

देशाला कॅशलेस बनवण्यासाठी आरबीआयचा निर्णय

यूपीआयचा वापर करत एटीएममधून बिना कार्डचे पैसे काढता येण्याच्या सुविधेचा विस्तार करण्यात येणार असल्याची माहिती आरबीआयचे गवर्नर शशीकांत दास यांनी शुक्रवारी दिली. यासह ते पुढे असेही म्हणाले की, ही सुविधा देशातील सर्व बँकांसाठी लागू होणार आहे. सरकारी बँक असो किंवा खासगी, प्रत्येक बँकेचा ग्राहक ही सुविधा वापरु शकणार आहे. दरम्यान, देशाला कॅशलेस बनवण्यासाठी आरबीआयकडून आवश्यक पाऊले उचलण्यात येणार आहे. पेमेंट सिस्टीममध्ये सुधारणा करुन जास्तीत जास्त लोकांना सुरक्षित, सुलभता आणि क्षमतेएवढे पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा येणार आहे.

(हेही वाचा – आता मिळणार ई-पासपोर्ट)

कोणत्या बँकेला मिळणार सुविधा

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला भारतीय स्टेट बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, बँक ऑफ बडोदा आणि RBL बँक आपल्या ग्राहकांना डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डचा वापर न करता एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. परंतु या सुविधेचा वापर करताना ग्राहकांना दैनंदिन व्यवहाराची मर्यादा 10 हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत असणार आहे.

असे काढता येणार कार्डशिवाय पैसे

  • वरील बँकेच्या खातेधारकांना त्या बँकेच्या अ‍ॅपमध्ये लॉग इन करावे लागते.
  • त्यानंतर त्यावर जाऊन कॅशवर क्लिक करावे. त्यापुढे एटीएम सेक्शनमध्ये गेल्यानंतर एटीएममधून जितकी रक्कम काढायची ती रक्कम तिथे नोंदवा.
  • या प्रक्रियेनंतर बँक तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर एक क्रमांक पाठवेल.यानंतरच एटीएममधून कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी त्या क्रमांकाचा आणि पिन क्रमांकाचा वापर करून पैसे काढणं शक्य होणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.