‘जिल्हा परिषदे’ च्या शाळांमध्ये विज्ञान विषयाचे शिक्षकच नाहीत!

140

सोलापूरमधील जिल्हा परिषदेच्या 2 हजार 798 शाळांसह राज्यातील 1 लाख 9 हजार शाळांमध्ये विज्ञानाचे जवळपास 13 हजार शिक्षक कमी आहेत. बारावीनंतर डी.एड. करुन शिक्षक झालेल्यांची संख्या खूप असल्याने सध्या विज्ञान विषयाच्या तुलनेत समाजशास्त्र व भाषा विषयांचे शिक्षकच अधिक झाले आहेत.

म्हणून विज्ञान विषयाचे शिक्षकच नाहीत

या ठराविक विषयांचेच शिक्षक असल्याने, सेवेत असणा-या  शिक्षकांवर विज्ञान, गणित, समाजशास्त्र व भाषा विषयाची जबाबदरी सोपवल्याचे शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागाने सहावी ते आठवीपर्यंतच्या मुलांसाठी सुरुवातीला भाषा, समाजशास्त्र, गणित- विज्ञान विषयांचा प्राधान्यक्रम ठरवला. पण, त्यामुळे झेडपीच्या शाळांमध्ये भाषा व समाजशास्त्राचेच शिक्षक सर्वाधिक झाले.

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार…

  • विज्ञान शाखेतून बारावी, डी.एड. केलेल्यांना मिळणार विषय शिक्षक म्हणून पदोन्नती.
  • 45 पटसंख्या असलेल्या वर्गासाठी विज्ञान व भाषा या विषांचे दोन शिक्षक आवश्यक
  • 46 ते 79 विद्यार्थ्यांसाठी भाषा, विज्ञान, समाजशास्त्र असे तीन शिक्षक गरजेचे 80 विद्यार्थ्यांपेक्षा अधिक पटसंख्येसाठी विज्ञान, भाषा, समाजशास्त्र, विज्ञान असे चार शिक्षक असतील.
  • शिक्षकांच्या बदल्यापूर्वी विषय शिक्षकांचा तिढा सुटणार.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.