पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना दुपारच्यावेळी शालेय पोषण आहार दिला जातो. कोरोना काळात शाळा बंद राहिल्याने या मुलांना तांदूळ व अन्य धान्य घरपोच देण्यात आले. आता फेब्रुवारीपासून शाळा पूर्ण क्षमतेने शाळा सुरू झाल्या आहेत. पण, त्यांना पोषण आहार शिजवून द्यायला तांदूळ नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील ४ हजार ८५ शाळांपैकी ३ हजार ६०० शाळांमधील मुलांना पोषण आहार मिळत नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
( हेही वाचा : कोकण रेल्वे मार्गावर नवी दहा स्थानके! )
पोषण आहार मिळालाच नाही…
कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र बाहेर आल्यानंतर शाळा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय झाला. पण, शाळेची वेळ सुरूवातीला सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आली होती. कडक उन्हामुळे शाळांची वेळ पुन्हा बदलण्यात आली. शाळा सुरू होऊन उन्हाळा सुट्टी लागायला ४३ दिवस शिल्लक असल्याने शासनाकडून वितरीत केलेल्या अन्नधान्याचे पैसे मिळतील की नाही, याची शाश्वती बचतगटांना नव्हती. त्यामुळे सोलापूरतील शाळांमध्ये मुलांना शालेय पोषण आहार मिळालाच नाही. घरापासून दूर अंतरावर शाळा आणि माध्यान्ह सुट्टी केवळ ३० मिनिटांचीच असल्याने त्यांना घरी जाऊन जेवून येणे सुद्धा अशक्य आहे. यामुळे जिल्ह्यातील मुलांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
Join Our WhatsApp Community