सध्या इंधन दरवाढीमुळे लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. सरकारही इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील नाशिकमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिथे कंपनीच्या गेटमधून बाहेर पडलेल्या 20 इलेक्ट्रिक स्कूटरने पेट घेतला. त्यामुळे या स्कूटर्सच्या सुरक्षेबाबत आता गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
स्कूटरच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह
देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी ईव्ही आगीची घटना!#ElectricVehicle #JitendraEV #evfire #Nashik pic.twitter.com/gkweP4fxvw
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) April 12, 2022
नाशिकमध्ये जितेंद्र ईव्ही (इलेक्ट्रिकल व्हेईकल) नावाची कंपनी आहे. गेटवर तयार केलेल्या स्कूटर उभ्या होत्या. अचानक त्या स्कूटर्सला आग लागली. तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, त्यामुळे स्कूटरच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. एकाच वेळी 20 स्कूटरला आग लागण्याची ही पहिलीच घटना आहे. कंपनीच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, आग कशामुळे लागली याचा तपास करत आहेत. सुरक्षितता ही त्यांची पहिली प्राथमिकता असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.
चौकशी होणार
केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने कंपनीकडून आगीच्या घटनेचा अहवाल मागवला आहे. अशा घटनांमुळे इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षेबाबत मोठी शंका निर्माण होत आहे.
( हेही वाचा: सोमय्यांनी ‘विक्रांत’ चे पैसे कुठे ठेवलेत? राऊतांनी सांगितला पत्ता )
लोकांना जीवही गमवावा लागला आहे
भारतात मागच्या काही दिवसांत इलेक्ट्रिक स्कूटर पेट घेण्याच्या घटना घडल्या आहेत. देशभरात आतापर्यंत चार इलेक्ट्रिक गाड्यांनी पेट घेतला आहे. यात दोघांचा जीवही गेला आहे. पर्यावरणाचा विचार करता, सरकार सर्वांना वीजेवर चालणा-या गाड्या वापरण्याचे आवाहन करत आहेत. पण, असे असताना जर या इलेक्ट्रिक गाड्या पेट घेत असतील तर वीजेवर धावणा-या गाड्यांचे भविष्य नेमके काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community