Online पैसे ट्रान्सफर करताय? तर ही बातमी नक्की वाचा

159

आता एका बँकेतून दुसऱ्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करणे सोपे झाले आहे. फोन पे, गुगल पे, अॅमेझॉन पे आणि इंटरनेट बँकिंग सारख्या अनेक पेमेंट अॅप्सच्या उपस्थितीमुळे डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. नेट बँकिंग आणि यूपीआय वॉलेटच्या माध्यमातून पैशांची देवाण-घेवाण अगदी सोयिस्कर झाले आहे. मित्र परिवारांपासून ते दुकानदारांपर्यंत सर्वांना पैसे देण्यासाठी लोक ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जातो. ही पद्धत जलद आणि सोयिस्कर असल्याने सर्वाधिक वापर आता होताना दिसतोय. परंतु एखाद्या साध्या चुकीमुळे तुमचे पेसै दुसऱ्याच्याच खात्यात गेले तर ते पैसे परत मिळवणे त्रासदायक ठरते. मात्र जर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करतांना चुकीने दुसऱ्यांच्या खात्यात गेले तर अशावेळी तुम्ही काय कराल…

आरबीआयचा हा नियम तुम्हाला माहितीये का?

ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे तिचा अकाऊंट नंबर अचूकपणे टाकणे ही पैसे पाठविणाऱ्याची जबाबदारी आहे. ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे तिचे नाव पेमेंट इन्स्ट्रक्शन्स आणि फंड ट्रान्सफरच्या मेसेजमध्ये नमूद केले जावे. जेणे करून ज्याला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत. ते योग्य त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होतील.

असे पाठवता येतात पैसे

  1. ऑनलाइन – एनईएफटी, आरटीजीएस आणि आयएमपीएस.
  2. ऑफलाइन – बँकेत जाऊन पावती भरून पैसे ट्रान्सफर करणे.
  3. यूपीआय – पेटीएम, फोन पे आणि भीम यांसारख्या अॅप्लिकेशन्सचा वापर करून पैसे दुसऱ्याला ट्रान्सफर करता येतात

जर चुकीच्या खात्यात पैसे गेले तर काय कराल?

  • तुमच्या कडून ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना जर चुकीच्या खात्यात पैसे गेले तर प्रथम कस्टमर केअरला फोन करून कळवा. ते आपला तपशील मागवून पुढील सूचना देतील.
  • तातडीने आपल्या बँकेत जाऊन याची माहिती मॅनेजरला द्यावी.
  • चुकीच्या खात्यात पैसे जमा केल्याबाबत स्क्रीनशॉटसह बँकेत अर्ज द्यावा.
  • ज्या व्यक्तीच्या खात्यात पैसे जमा झाले त्या व्यक्तींचा फोन नंबर बँकेकडून मिळवावा. यानंतर त्यास पैसे परत देण्याची विनंती करावी.

नकार दिल्यास काय करावे?

  • अशा स्थितीत कायदेशिर कारवाई करणे हा एकच पर्याय शिल्लक उरतो.
  • यासाठी रीतसर तक्रार करावी. कोर्टाद्वारे व्यक्तीला नोटीस पाठवून कारवाई करता येते.

अवैध खात्यात पैसे जमा झाल्यास काय करावे?

  1. अशा प्रकारात बँकेचीच मदत घ्यावी लागेल. तुमचे आणि त्या व्यक्तीचे खाते एकाच बँकेत असेल तर बँक त्या व्यक्तीला पैसे परत करण्याची विनंती करू शकते. ती व्यक्ती तयार असल्यास पैसे ७ दिवसात परत मिळू शकतात.
  2. तुमचे आणि त्या व्यक्तीचे खाते वेगवेगळ्या बँकोमध्ये असेल तर तुम्हाला रिसिव्हरच्या बँकेत जाऊन मॅनेजरची भेट घ्यावी लागेल. ते मॅनेजर तुम्हाला पुढची मदत करू शकतात.
  3. पैसे परत करण्याची प्रक्रिया रिसिव्हरचे खाते ज्या बँकेत असेल तिलाच पार पाडावी लागते.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.