देवघर रोपवे दुर्घटना; ४० तासांचा थरारक संघर्ष

138

झारखंडमधील देवघरमध्ये रोपवे दुर्घटनेत 40 तास उलटूनही लोकांना वाचवण्याचे काम सुरूच आहे. त्रिकुट टेकड्यांवर लष्कर, आपत्कालीन व्यवस्थापन आणि राज्य सुरक्षा यंत्रणा मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या उणिवांवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.

भारतीय हवाई दल, लष्कर, इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस, एनडीआरएफसह स्थानिक प्रशासन त्रिकुटा टेकड्यांवरील क्रॅश झालेल्या रोपवेमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी व्यवस्था करत आहेत. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून, ट्रॉलीमध्ये एकूण 48 जण होते. ज्यामध्ये लहान मुले आणि महिलांचाही समावेश आहे. मंगळवारी सकाळी लष्कर आणि इतर मदत आणि बचाव पथकांनी MI17 हेलिकॉप्टरमधून बचावकार्य सुरू केले.

अपघातातून वाचला, तरीही वेदनादायक मृत्यू 

रोपवेच्या ट्रॉलीमध्ये पडून तरुणाचा मृत्यू झाला आहे. रोपवेवरून हेलिकॉप्टरकडे जात असताना त्याचं नियंत्रण सुटलं आणि तो डोंगरात पडला. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला.

सरकारवर हल्ला

माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर हल्लाबोल केला आहे. झारखंडच्या नाकर्त्या सरकारमुळे लोक हवेत लटकत होते, असे ते म्हणाले. अपघात होऊन तास उलटून गेले तरी सरकारकडून मंत्री व नेते पोहोचले नव्हते. राज्य सरकारने जनतेच्या जीवाची काळजी केली नाही. तातडीने निर्णय न घेतल्याने प्रवासी हवेतच लोंबकळत राहिले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.