मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी दारू दुकाने, बार यांना देवता किंवा महापुरुषांचे नाव देण्याचा ट्रेंड दिसून येत आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पंकज यादव यांनी २१ जानेवारी २०२० रोजी ठरावाची सूचना मांडत मुंबईतील दारूची दुकाने, बार यांना देवी-देवता, महापुरूषांची नावे ठेवण्यास बंदी घालावी, अशी मागणी केली होती. अखेरीस राज्याच्या गृहविभागाने आदेश काढून ही बंदी घातली आहे. त्यामुळे भाजपच्या पाठपुराव्याला यश आल्याचे म्हटले जात आहे.
देवी-देवतांची नावे न देण्याबाबत तरतूद नाही
बृहन्मुंबईतील उपाहारगृहे, मद्यालये, पब, डिस्को डान्स बार, मद्यालये, मद्यविक्री करणारी दुकाने अशा आस्थापनांच्या नावांमध्ये देवदेवतांच्या नावांचा सर्रास वापर करण्यात येत असल्याचे दिसून येते. वास्तविक प्रत्येक धर्मात देवदेवता पूजनीय असतात आणि त्यांच्याप्रती प्रत्येक धर्मियांमध्ये श्रध्देची भावना असते. त्यामुळे, मद्यालये, इत्यादी आस्थापनांना देवदेवतांची नावे देण्यात येत असल्याने, विविध धर्मियांच्या भावना दुखावतात. दुकाने व आस्थापना अधिनियमामध्ये दुकाने व विविध आस्थापना यांना महापुरुष किंवा गड किल्ल्यांची नावे न देण्याबाबत तरतूद आहे. मात्र, देवी-देवतांची नावे न देण्याबाबत कोणतीही तरतूद नाही.
पालिका प्रशासनाने काय म्हटले?
सद्यस्थितीत, महानगरपालिकेला दुकाने / आस्थापना यांना नामफलकाच्या संदर्भातच कारवाई करण्याचे अधिकार आहेत; ही वस्तुस्थिती लक्षात घेता, महानगरपालिकेचे असे ठाम मत आहे की, उपाहारगृहे, मद्यालये, पब, डिस्को डान्स बार, मद्यालये, मद्य विक्री करणारी दुकाने अशा तत्सम आस्थापनांना देवी-देवतांची नावे देण्यास प्रतिबंध करता येईल, अशारितीने दुकाने व आस्थापना अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात यावी असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.
(हेही वाचा – सोमय्या अडकले, दरेकर वाचले; उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा )
भाजपने केली होती मागणी
मुंबईतील रेस्ट्रोबार, पब, डिस्को डान्सबार तसेच दारुच्या दुकानांना देवदेवतांची नावे देण्यास भाजपने तीव्र विरोध दर्शवला आहे. दुकान व विविध आस्थापना यांना परवाना (लायसन्स) देण्यात येणार्या महापालिका अधिनियमांमध्ये सुधारणा करून देवदेवतांची नावे रेस्ट्रोबार, पब, डिस्को डान्सबार तसेच दारुची दुकाने यांना देण्यात येवू नये याकरता नियमात बदल करावा आणि अशाप्रकारे देण्यात आलेल्या देवदेवतांच्या नावांच्या पाट्या काढून टाकण्यात याव्यात, अशी मागणी भाजपचे जोगेश्वरी पूर्व येथील नगरसेवक पंकज यादव यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी केली होती, त्यानुसार महापालिकेत ठरावही करण्यात आला होता. परंतु याबाबतचा अधिसूचना जारी करताना देवदेवतांची नावे ठेवण्यावर निर्बंध घालण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. उलट महान व्यक्ती व गडकिल्ल्यांची नावे ठेवण्यावर निर्बंध घालण्यात आले.
Join Our WhatsApp Community