रामनवमीच्या दिवशी जेएनयूयामध्ये डाव्या संघटनांनी हिंसाचार घडवून आणला, त्यावेळी त्यांनी अभाविपला जबाबदार ठरवले, मात्र दोन दिवसांनी हिंसाचारामागील सत्य समोर आले आहे. हा हिंसाचार अभाविपने नव्हे तर डाव्या संघटनांनी घडवून आणला आहे, असे समोर आले आहे.
#JNU student Divya was greviously injured with a broken glass bottle as she arrived to attend the #RamNavami havan on the JNU campus.
#ABVP students were subjected to lewd abuses by AISA & SFI goons.And with that, the pseudo-secular brigade has gone into hibernation!!
1/2 pic.twitter.com/tiHi5hMN1Y
— Priti Gandhi – प्रीति गांधी (@MrsGandhi) April 10, 2022
रविवारी रात्री जवाहरलाल नेहरू विद्यापीठावर डाव्या विद्यार्थी संघटनेच्या लोकांनी हिंसक हल्ला केला होता. या संदर्भात जेएनयू व्यवस्थापनाने महत्वाचा खुलासा केला आहे. त्यात त्यांनी हा वाद केवळ कावेरी वसतिगृहात रामनवमीच्या दिवशी होम हवन करण्यावरून झाला होता. जेएनयूचे रजिस्ट्रार रविकेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांना कावेरी वसतिगृहात रामनवमीच्या दिवशी होम हवन करायचे होते. ज्याला डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. वसतिगृह व्यवस्थापनाच्या मध्यस्थीने होम हवन शांततेत पार पडले.
(हेही वाचा आधी माझ्या ‘वसंता’ला बोलू द्या! राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेत पुण्याला मान)
का झाला हिंसाचार?
रजिस्ट्रार रविकेश यांच्या म्हणण्यानुसार, अभाविपच्या विद्यार्थ्यांनी मांसाहाराबाबत कोणालाही विरोध केला नाही. शांततेत होम हवन केल्यानंतर डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी गोंधळ सुरू केला. याचे उत्तर अभाविप संघटनेच्या विद्यार्थ्यांनी दिले. ज्यामुळे काही वेळातच त्याला हिंसक वळण आले. यामध्ये अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींना गंभीर दुखापत झाली आहे.
JNU Press Release dated 11.04.2022 pic.twitter.com/Pu2LLooZHy
— Jawaharlal Nehru University (JNU) (@JNU_official_50) April 11, 2022
डाव्या संघटना खोटे बोलतात
विद्यार्थी जखमी झाल्यानंतर डाव्या संघटनांच्या नेत्यांनी ‘अभाविपशी संलग्न असलेल्या विद्यार्थ्यांनी मांसाहाराला विरोध केला. अभाविपच्या विद्यार्थ्यांनीच मांसाहाराचे समर्थन करणाऱ्या डाव्या संघटनेच्या विद्यार्थ्यांवर हल्ला चढवला होता. यामध्ये अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचा त्यांचा दावा आहे, तर जेएनयूच्या रजिस्ट्रारच्या वक्तव्याने या प्रकरणाचे सत्य समोर आले आहे.
Join Our WhatsApp Community